BRICS Summit 2026: 18 वी ब्रिक्स परिषद (BRICS Summit 2026) भारतात पार पडणार आहे. 12 आणि 13 सप्टेंबरला राजधानी दिल्लीत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 'भारत मंडपम' इथं जय्यत तयारी करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin ) भारतात दाखल झाले. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही भारतात येणार आहेत. जागतिक राजकारणातील बदलते सत्तासमीकरण, अमेरिका-चीन व्यापार आणि सामरिक तणाव, युक्रेन युद्ध तसेच ‘ग्लोबल साऊथ’च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर 18वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तसंच जागतिक महासत्ताचे नेते भारतात येणार असल्यानं राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

#WATCH | Delhi: Russian President Vladimir Putin arrives in India ahead of the BRICS Summit 2026. During his visit, he will also hold talks with PM Narendra Modi and have a series of bilateral meetings. pic.twitter.com/pax5EW70Yu

— ANI (@ANI) September 10, 2026

सब्बल सात वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार- (Xi Jinping to visit India after a full seven years)

ब्रिक्स परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येणार आहेत. सब्बल सात वर्षांनंतर जिनपिंग भारतात येणार आहेत. रशियाचे अध्यक्ष पुतीनही ब्रिक्स परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. तर इराणचे अध्यक्ष पेजेश्कियनही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ब्रिक्सच्या निमित्ताने मोदी - जिनपिंग - पुतीन - पेजेश्कियन एकत्र एका व्यासपीठावर दिसतील. विशेष म्हणजे रशिया, चीन, भारत, इराण या चारही देशांचा सध्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी या ना त्या स्वरूपाचा संघर्ष सुरू आहे. 12 आणि 13 तारखेला ब्रिक्स परिषद नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होणार आहे. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांतील सुधारणांना चालना मिळेल. मात्र दोन्ही देशांमधील व्यावसायिक आणि आर्थिक संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अजून फारशी सकारात्मक चिन्हं दिसत नाहीत.

#WATCH | Delhi: Security has been tightened at the Bharat Mandapam ahead of the BRICS Summit 2026.

(Visuals from Pragati Maidan) pic.twitter.com/NfPEzDu6mg

— ANI (@ANI) September 11, 2026

मोदी-पुतिन चर्चेत संरक्षणापासून ऊर्जा क्षेत्रापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा- (Modi and Putin discuss a range of issues)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची यापूर्वीची भेट 31 ऑगस्ट रोजी बिश्केक येथे झालेल्या SCO शिखर परिषदेदरम्यान झाली होती. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया यांच्यातील राजकीय, आर्थिक, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ तसेच नागरिकांमधील संपर्कासह विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेतला होता. संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्यावरही पंतप्रधान मोदी यांनी भर दिला होता. आता दिल्लीत होणाऱ्या चर्चेत संरक्षण सहकार्यावर विशेष लक्ष असण्याची शक्यता आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या संभाव्य अपग्रेडसह रशियाकडून मिळणाऱ्या S-400 प्रणालींच्या उर्वरित पुरवठ्यावर आणि Su-57 लढाऊ विमानासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतात नवीन नागरी अणुभट्ट्या उभारण्याची योजना आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य हे देखील चर्चेचे प्रमुख मुद्दे असू शकतात.

BRICS बिझनेस फोरममध्येही सहभागी होणार पुतिन- (Putin to participate in the BRICS Business Forum as well)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे BRICS शिखर परिषदेसोबतच बिझनेस फोरमशी संबंधित कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत. ते BRICS बिझनेस फोरमच्या पूर्ण अधिवेशनाला संबोधित करतील. भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार, गुंतवणूक आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवरही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पुतिन यांच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकींसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका होण्याची शक्यता आहे. BRICS परिषदेदरम्यान दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि इजिप्तसह अनेक देशांच्या नेत्यांशी पुतिन चर्चा करू शकतात.

शी जिनपिंग 12 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये दाखल होणार- (Xi Jinping will arrive in Delhi on 12 September)

BRICS Summit 2026 मधील सर्वात महत्त्वाच्या राजनैतिक घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेटही महत्त्वाची ठरणार आहे. शी जिनपिंग 12 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये दाखल होतील आणि शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक करतील. BRICS परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांच्यासोबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेला तणाव आणि ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित मुद्दे या बैठकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. इराणचा BRICS मध्ये समावेश झाल्यानंतर पश्चिम आशियाशी संबंधित मुद्द्यांवर या संघटनेची भूमिका अधिक महत्त्वाची बनली आहे. त्यामुळे भारतासाठी इराणसोबत संतुलित आणि धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्यासंदर्भातील चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, VIDEO:

संबंधित बातमी:

Vladimir Putin visits India: व्लादिमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येणार; 9 महिन्यांत दुसऱ्यांदा दौरा,मोदींसोबत द्विपक्षीय बैठक होणार