पॅरिस : फ्रान्समध्ये वाढती महागाई, सार्वजनिक सेवांची खराब स्थिती आणि शाळांच्या समस्यांच्या मुद्यावर शनिवारी 17 ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली. पॅरिससह काही शहरांमध्ये आंदोलनावेळी पोलीस आणि आंदोलक आमने सामने आले. काही ठिकाणी दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि लूटमारीच्या घटना झाल्या. काही ठिकाणी इमारतींना आग लावण्यात आली आहे. फ्रान्सचे पंतप्रधान सेबेस्टियन लेकार्नू यांच्या मतानुसार 1200 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 150 पोलीस जखमी झाले आहेत.

फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेज यांच्या माहितीनुसार 5.5 लाख रस्त्यावर उतरले होते. यामध्ये 1.1 लाख लोक पॅरिसमध्ये रस्त्यावर उतरले होते. मात्र, आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या दाव्यानुसार 8 लाख लोक रस्त्यावर उतरले होते.

पॅरिसमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट

पॅरिसमध्ये दिवसा आय़ोजित करण्यात आलेला मुख्य मोर्चा शांततापूर्ण पार पडला. मात्र, रात्रीच्या वेळी स्थिती बिघडली. आंदोलकांनी रस्त्यांवर आग लावून दिली, वाहनांचं नुकसान केलं. प्लेस डे ला रिपब्लिक जवळ आग लावून दिली. या दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांना हटवण्यासाठी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीमार देखील केला. काही दुकानांमध्ये आणि व्यापारी संस्थांमध्ये तोडफोड आणि लूटमारीच्या घटना देखील घडल्या.

मॅक्रॉन यांच्याकडून हिंसाचाराच्या घटनांचा निषेध

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आग लावणे, लूटमार करणे, सरकारी इमारतींवर हल्ले या घटनांमध्ये सहभागी असलेल्यांचा निषेध केला आहे. हिंसा आणि तोडफोड करणाऱ्यांविरोधात कायदेशीरकारवाई केली जाईल, असं मॅक्रॉन म्हणाले. पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी देखील हिंसाचाराच्या माध्यमातून राजकीय अजेंडा पुढं रेटण्यास मंजुरी दिली जाऊ शकत नाही, असं म्हटलं. हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही सेबेस्टियन लेकोर्नू म्हणाले.

फ्रान्समध्ये लोक रस्त्यावर का उतरले?

फ्रान्समध्ये शाळांची खराब स्थिती आणि शिक्षकांची संख्या कमी असल्याच्या मुद्यावर आंदोलन सुरु झालं होतं. यामध्ये महागाई, इंधनाचे वाढते दर, आर्थिक संकट आणि सार्वजनिक सेवांच्या दर्जामधील घसरण यासारख्या मुद्यांचा समावेश होत गेला. ट्रेन यूनियन्सने वेतन आणि पेन्शन सारख्या मुद्यांचा समावेश त्यात केला.

आंदोलनातील सहभागी असणारे लोक हिंसाचाराच्या घटनेत सहभागी नव्हते. काही शहरांमध्ये मोठ्या संख्येनं शांततापूर्ण मार्गानं मोर्चा काढला. हिंसाचाराच्या घटना काही ठिकाणी झाल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. काही ठिकाणी दुकाने आणि सरकारी इमारतींचं नुकसान करण्यात आलं.