नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांनी इराणविरोधात युद्ध 28 फेब्रुवारीपासून सुरु केलं होतं. मात्र, इराणनं अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर कडवा प्रतिकार केला. काही काळानंतर इस्त्रायलनं या संघर्षातून माघार घेतली मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत संघर्षाची भूमिका कायम ठेवली आहे. अमेरिकेकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्यात आली आहे. इराणच्या क्रूड ऑईलच्या विक्रीवर प्रतिबंध घालून त्यांची आर्थिक कोंडी करण्यााच अमेरिकेचा प्रयत्न आहे. इराणच्या इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलानं एक मोठा दावा केला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेची अत्याधुनिक मनुष्यविरहित पाणबुडी रेमस 600 वर कब्जा मिळवल्याचा दावा IRGC नं केला असून त्याचा एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे.

इराणमधील सरकारी चॅनेल IRIB कडून एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. आयआरजीसीच्या मोहिमेत इराणच्या सैन्यानं स्ट्रॅटेजिक वॉटरवेजमध्ये पकडण्यात आलेली पाणबुडी अमेरिकन सैन्याची असल्याचं म्हटलं आहे.

IRGC नं काय म्हटलं?

अमेरिकेच्या मनुष्यविरहित पाणबुडीवर कब्जा मिळवल्यानंतर आयआरजीसीनं माहिती दिली आहे. कोऑर्डिनेटेड आणि कॉम्ल्पेक्स ऑपरेशनद्वारे हा ताबा मिळवण्यात आला. इराणच्या सैन्यानं गोपनीय नियंत्रण आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या क्षमतेचा वापर करत पाणबुडी पकडल्याचा दावा केला. आयआरजीसीच्या नौदलाच्या सैनिकांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाणबुडीवर वर्चस्व मिळवत होर्मुझच्या सामुद्रधुनीत गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या अमेरिकेच्या अत्याधुनिक UAV वर ताबा मिळवलं.

Iran’s IRGC Navy has claimed to have captured a U.S. Remus 600 autonomous underwater vehicle (UUV) today near the Strait of Hormuz. The U.S. military designation is the Mk 18 Mod 2 Kingfish. pic.twitter.com/7FTMH4LUwP

— OSINTdefender (@sentdefender) September 27, 2026

पाणबुडीची माहिती गोळा करण्याचं काम सुरु : IRGC

IRGC च्या नौदलाकडून ताबा मिळवलेली अमेरिकन पाणबुडी रेमस 600 असल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकन अत्याधुनिक पाणबुडी पाण्यात चालकाशिवाय फिरणारी असल्याचं म्हटलं. या अत्याधुनिक अंडर वॉटर UAV द्वारे होर्मुझच्या सामुद्रधुनीत हेरगिरी करण्यात येत होती, असं आयआरजीसीनं म्हटलं. नौदलाच्या तज्ज्ञांकडून याबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचं IRGC नं म्हटलं.