Lovers in Blue Night Movie Review: लव्हर्स इन ब्ल्यू नाईट : स्थलांतरितांचं अंतरंग

2 weeks ago 5
ARTICLE AD

Lovers in Blue Night Movie Review: दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय व्हेनिस सेन्सेशन बनलेय. मागच्या वर्षी 82 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनुपर्णा रॉयला 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' (Songs of Forgotten Trees) या पहिल्याच चित्रपटासाठी ओरिझॉन्टी (Orizzonti / Horizons) विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक चा पुरस्कार मिळाला. यंदा 83 व्या व्हेनिस फेस्टिव्हलमध्ये लव्हर्स इन ब्ल्यू नाईट (Lovers in Blue Night) सिनेमासाठी नेटपॅक (NETPAC) चा सर्वोत्तम आशियाई सिनेमाचा पुरस्कार मिळाला. बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहाजिकच या सिनेमासाठी प्रचंड गर्दी झाली. पश्चिम बंगालच्या पुरुलिया भागातून एक मुलगी स्वप्नांचं शहर मुंबईत येते. इथं सिनेमा इंडस्ट्रीत स्ट्रगल करताना स्वताचा सिनेमा बनवते. प्रतिष्ठित व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शक बनते हे खरंच कौतुकास्पद आहे.

लवर्स इन ब्ल्यू नाईट (2026) - Lover in Blue Nights ही चार स्थलांतरित लोकांची गोष्ट आहे. सिनेेमात मराठी, हिंदी आणि सिलहटी बंगाली बोलली जातेय. हे चार ही जण बाहेरुन आल्यानं मुंबईच्या काही मोजक्या जागा सोडल्यास शहर दिसत नाही. जेव्हा कामगार वर्गातले लोक स्थलांतर करतात तेव्हा नव्या शहरात त्यांना आपलंस वाटणाऱ्या त्यांच्या जागा तयार होतात. मग आपण काय करतोय, कसं जगणार, पुढे कसं जाणार, याचा विचार करण्याची त्यांची ती जागा त्यांच्या जगण्याचा भाग असते. पूर्ण शहर ते भटकू शकत नसले तरी या जागेत त्यांना आपलंस वाटतं. मुंबईचा समुद्र आणि किनाऱ्यावरुन दिसणारं अमर्याद आकाश हे या स्थलांतरिताची हक्काची जागा होते. या अमर्याद आसमंतात त्यांना आपली स्वप्न पुरी करण्याची उमेद मिळते.

अनुपर्णाच्या सिनेमातला करीम (Preetam Palania), शहरात उंदीर मारण्याचं औषध विकण्याचं काम करतो. त्याची बायको अमिनाला (Neelima Sharma) लिहिता-वाचता अजिबात येत नाही. पण तिचा आवाज गोड आहे. यामुळं तिला बारमध्ये दारु पिऊन धुंद झालेल्या ग्राहकांशी फोनवर लगटीनं बोलण्याचे काम मिळतं. तिथं तिला ओमरान (Jatin Sharin) भेटतो. बारमध्ये काम करताना त्याला धर्म लपवावा लागतो. तो आता ओम होतो. सुक्का (Bhushan Shimpi) उत्तर महाराष्ट्रातला, मुंबईत आला आणि चोऱ्या करायला लागला. त्याच्यावर स्थानिक राजकिय नेत्याचा हात आहे. आंतरजातीय विवाह केल्यानं तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत लपून मुंबईत राहतोय. असे हे चार ही जण मुंबईसारख्या महानगरात स्वप्न पाहतायत. या शहराचा भाग बनू पाहतायत. शांताराम ग्रेगोरी डेव्हिड रॉबर्ट्स (Gregory David Roberts) नं मुंबई शहराचं वर्णन सिटी ऑफ फ्लेश (City Of Flesh) असं केलंय. या मांसांच्या शहरात ही माणसं आपआपल्या पध्दतीनं एडजस्ट होतायत.

अनुपर्णाची मागची फिल्म 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' (Songs of Forgotten Trees) आणि. आताची लव्हर्स इन ब्ल्यू नाईट (2026) - Lover in Blue Nights या दोघांमध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत. दोन्ही फिल्म मुंबईतल्या स्थलांतरितांची गोष्ट दाखवतात. दुसरी आणि महत्त्वाची त्यांच्या सेक्युएलिटीवर स्ट्रॉग कमेंट करतात. हाडा मांसाचा माणूस कामाच्या शोधात या शहरातून त्या शहरात भटकतो. तेव्हा त्याच्या भावनिक गरजांसोबत शारीरिक गरजाची घेऊन तो फिरत असतो. लव्हर्स इन बल्यू नाईटमधली सर्व पात्रं आपली जमिन शोधतायत आणि आपली सेक्युएलिटीही. या सिनेमाचा गाभा आहे.

पश्चिम बंगालमधून आल्यानं अनुपर्णा रॉयची राजकिय नजर पक्की आहे. तिनं दोन्ही सिनेमातून राजकारणावर बेमालूम टिपन्नी केलीय. मुंबई शहरातलं राजकारण तसंच सामाजिक-आर्थिक बाबींच्या सुक्ष्म गोष्टी तिने दाखवल्यात. पात्रांना स्थलांतराचा जागतिक संदर्भ दिलाय. यामुळंच अनुपर्णाचा सिनेमा ग्लोबल बनलाय. हेच तिच्या व्हेनिस सेन्सेशन बनण्याचं गमक असावं.

Read Entire Article