Nepal Floods Marathi News: नेपाळमध्ये आलेल्या भयंकर पुरामुळे आतापर्यंत तब्बल 168 हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 1,100 पेक्षा जास्त लोकांचा अजूनही शोध लागलेला नसल्याची माहिती आहे. नेपाळ-तिबेट सीमेवर आलेल्या अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे (Nepal Flash Flood) 466 परदेशी आणि 113 नेपाळी नागरिकांचा बेपत्ता झालेल्यांमध्ये समावेश आहे. यामध्ये 105 भारतीय आणि 37 अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. अशातच या प्रलयकरी पुरात महाराष्ट्रातील 80 नागरिक नेपाळमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. तर अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. (Nepal Floods Marathi News)

Nepal Floods : जिल्हानिहाय माहिती संकलन आणि पडताळणी सुरू, मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत

दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये 80 पैकी 57 नागरिक ‘रिचा टूर्स’ या ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून नेपाळला गेले असल्याची माहिती आहे. तर अडकलेल्या सर्व 80 नागरिकांची ओळख पटविण्याचे सध्या काम सुरू असून यातील 4 नागरिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती आहे. एकीकडे SEOC महाराष्ट्रकडून जिल्हानिहाय माहिती संकलन आणि पडताळणी सुरू करण्यात आली असून दुसरीकडे अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांशी आणि प्रवासी एजन्सीशी सातत्याने समन्वय साधण्यात येतोय. मदतीसाठी राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत करण्यात आल्याचीही माहिती आहे. गृह मंत्रालयाच्या Integrated Control Room – Emergency Response सोबतही महाराष्ट्र शासनाकडून समन्वय सुरू आहे.

CMO Maharashtra : राज्य सरकारकडून हेल्प डेस्क कार्यरत

महाराष्ट्र राज्य नियंत्रण कक्षाकडून एक विशेष टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1070 आणि नियंत्रण कक्ष 91-9321587143 क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी, त्यांचे मित्र, नातेवाईक जर नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात येत आहेत. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात 24 तास हा कक्ष कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.…

— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 26, 2026

Chinese Ambassador Zhang Maoming: 'या कठीण काळात आम्ही नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत'

किंबहुना, चीनने नेपाळी बाजूला झालेल्या भूकंपाला हिमनदी फुटण्यासाठी जबाबदार धरले आहे. नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी रसुवामधील विनाशकारी पुराविषयी एका नेपाळी वाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले, "या कठीण काळात आम्ही नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत." सध्या उपलब्ध असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेपाळी बाजूला भूकंप झाला, ज्यामुळे हिमस्खलन आणि त्यानंतर भूस्खलन झाले. परिणामी, ग्यिरोंग-रसुवागढी सीमावर्ती भागातील नेपाळी आणि चिनी दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली असून काही व्यक्ती बेपत्ता आहेत.

Nepal Floods : आधी आणि नंतरची छायाचित्रे

प्लॅनेट लॅब्सने आधीची आणि नंतरची उपग्रह छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यामध्ये प्राथमिक अभ्यासात असेही उघड झाले आहे की, बर्फ आणि खडकांच्या भूस्खलनामुळे ल्हेंडे नदीत गाळयुक्त पूर आला होता. व्हिडिओ शेअर करताना नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने लिहिले आहे की - प्लॅनेट लॅब्सने उपग्रह प्रतिमांच्या केलेल्या विश्लेषणावर आधारित प्राथमिक अभ्यासात असे दिसून आले आहे की, नेपाळ-चीन रसुवागढी सीमा ओलांडण्याच्या ठिकाणापासून सुमारे २० किमी ईशान्येस नेपाळ-चीन सीमेवर बर्फ आणि खडकांचे भूस्खलन झाल्यामुळे ल्हेंडे नदीला हिमनदीमुळे पूर आला होता.

Planet Labs को स्याटेलाइट तस्बिरको विश्लेषणका आधारमा गरिएको प्रारम्भिक अध्ययनबाट नेपाल-चीन रसुवागढी नाकाबाट करिब २० किलोमिटर उत्तरपूर्व नेपाल-चीन सिमानामा गएको हिम-चट्टान पहिरोका कारण ल्हेन्दे खोलामा गेग्य्रानसहितको बाढी आएको देखिएको छ। pic.twitter.com/kCAo9O1Zb0

— NDRRMA (@NDRRMA_Nepal) August 26, 2026

इतर महत्वाच्या बातम्या

Nepal Flash Flood: नेपाळमधील प्रलयात आतापर्यंत 165 जणांचा अंत, 133 भारतीयांसह 1100 बेपत्ता; तब्बल दीडशे किमी दूर 33 मृतदेह सापडले; दुर्घटनेतील सर्वात धक्कादायक कारण समोर