Nepal Flash Flood: नेपाळमध्ये संकटांचे ढग कायम, पूरग्रस्त भागात पुन्हा वादळ अन् जोरदार पावसाचा इशारा; आठही जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीवर शोध अन् बचाव कार्य सुरु

2 months ago 9
ARTICLE AD

Nepal Flash Flood: नेपाळमधील बुधवारच्या विनाशकारी पुरानंतर अद्यापही परिस्थिती (Nepal Flash Flood) गंभीर आहे. नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा 675 वर पोहोचला आहे, तर 2400 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, नेपाळ हवामान विभागाने पूरग्रस्त भागात पुन्हा पाऊस आणि वादळी पावसाचा (Rain) इशारा दिला असून, पुराचा सतर्कतेचा इशारा (Nepal Weather) जारी केला आहे. यामुळे बचाव कार्याबद्दल तसेच पूरग्रस्त भागातील लोकांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. पूरग्रस्त आठही जिल्ह्यांमध्ये शनिवारी शोध आणि बचाव कार्य सुरू होते. यात आठ जिल्ह्यांमध्ये युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. (Nepal Flash Flood News)

आतापर्यंत पूरग्रस्त आठही जिल्ह्यांमधून 675 मृतदेह सापडले आहेत. बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नेतृत्वाखालील पथके लोकांना सतत सुरक्षित स्थळी हलवत आहेत आणि बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.

Nepal Flash Flood News : पूरग्रस्त आठही जिल्ह्यांमधून 675 मृतदेह सापडले

दरम्यान, नेपाळ-तिबेट सीमेजवळ एक हिमनदी फुटली, ज्यामुळे बर्फ आणि खडकांचे ढिगारे खाली कोसळले. यामुळे मध्य नेपाळच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी, चिखल आणि ढिगारे वाहून आले. मुसळधार पावसामुळे शहरे आणि गावे उद्ध्वस्त झाली, महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आणि अनेक जलविद्युत प्रकल्प वाहून गेले. यात जवळपास 2,500 लोकांना वाचवण्यात आले आहे. आतापर्यंत, बचाव कार्यादरम्यान अंदाजे 2,500 लोकांना वाचवण्यात आले आहे. ज्यात 163 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बाधित भागांमध्ये अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात आव्हाने निर्माण होत आहेत.

Nepal Flash Flood:  नेपाळमधील 108 भारतीय नागरिकांची सुटका; युद्धपातळीवर शोध अन् बचाव कार्य सुरु

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने 29 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 10:30 वाजेपर्यंत नेपाळमधील बाधित भारतीय नागरिकांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये 108 भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे, तर 50 भारतीय नागरिकांशी पुन्हा संपर्क साधण्यात आला आहे.

Nepal Flash Flood News :  275 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता

598 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले आहेत. ही माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, अंदाजे 900 भारतीय नागरिक अजूनही चीनमधून निघालेले नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सर्वजण सुरक्षित असून बीजिंगमधील भारतीय दूतावास त्यांच्याशी थेट किंवा स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत संपर्कात आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या 275 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत, तर भारतीय वंशाचे 128 लोकही बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

India on Nepal Flash Flood : भारताकडून मदत साहित्याची चौथी खेप

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारतातून 11 टन मदत साहित्य घेऊन जाणारे चौथे विमान नेपाळसाठी रवाना झाले आहे. याव्यतिरिक्त, 230 फूट लांबीच्या एकपदरी मॉड्युलर स्टील पुलाच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणारे 16 ट्रक नेपाळमध्ये दाखल झाले आहेत.

नेपाळमधून 143 भाविक मायभूमी महाराष्ट्रात परतले; रेल्वेने 106 जण नागपूरला, मुंबईत 37 जण उतरले, कुटुंबीयांन आनंदाश्रू

Read Entire Article