Nepal Flood Viral House Video: नेपाळमधील महापुरात भक्कम असलेल्या घराची Inside Story

2 months ago 9
ARTICLE AD

Nepal Flood Viral House Video: नेपाळच्या महाप्रलयात अनेक घरं पत्त्यासारखी कोसळली. इमारती उद्ध्वस्त झाल्या. पण या महाप्रलयातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये निसर्गाच्या या महाप्रलयात एक घर मजबूतपणे उभं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पुरात या घराची एकही वीट ढासळली नाही आणि घरात अडकलेले नागरिकही सुखरूप राहिले. एबीपी न्यूजचे प्रतिनिधी बिलाल अहमद यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरुन वृत्तांकन केलंय.

नेपाळच्या महाप्रलयातील व्हायरल घराची गोष्ट- (Nepal Floods Viral House Video)

नेपाळच्या महाप्रलयामध्ये ज्या घराची जोरदार चर्चा आहे ते त्रिशूलीमधील हिरव्या रंगाचं घर आहे, ज्यामध्ये लोक अडकले होते. बुधवारी जेव्हा इथे पुरानं कहर केला तेव्हा हे घर मजबूतीने या पुरात उभं होतं. नदीचा रूद्रावतार,आजूबाजूला पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि त्यात वाहून जाणारी वाहनं आणि हे सगळं पाहत धीरानं या घरात उभी असलेली माणसं हे दृश्यं धडकी भरवणारं होतं. कोणत्याही क्षणी हे घर या प्रवाहात वाहून जाईल असं वाटत होतं. मात्र पुरानंतरची दृश्यं पाहिली असता ग्राऊंड फ्लोअरवर चिखल दिसतोय... मात्र महाप्रलयानंतरही घर जशच्या तसं उभं होतं. आणि ते देखील  एकही वीट न ढासळता.पूर ओसरल्यानंतर हेलिकॉप्टरनं आणि दोरीच्या साहाय्यानं घरातल्या सर्वांना सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आलं.

नेपाळच्या पुरानं अब्जावधींचं नुकसान केलं.अनेक इमारती या महाप्रलयात पत्त्यासारख्या कोसळल्या. पण हे घर मात्र मजबूतीने उभं राहिलं. म्हणूनच म्हणतात 'घर असावं तर असं' नेपाळच्या महाप्रलयातून वाचलेलं घर एवढ्या महापुरात कसं वाचलं असा अनेकांना प्रश्न पडला होता. एबीपी न्यूजचे प्रतिनिधी तिथंपर्यंत पोहोचले.महाप्रलयात टिकून राहिलेलं घर चार मजली आहे. वरच्या मजल्यावरील बाल्कनीमध्ये लोक अडकले होते. म्हणजेच जवळपास तीन मजले महाप्रलयात पाण्यात बुडाले होते. नेपाळमधील त्रिशुलीमधील या घराची सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा सुरु आहे. महाप्रलयानंतर पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या घरात अडकलेल्यांची सुटका करण्यात आली आहे. या घरातून सुटका करुन त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे.

Read Entire Article