Operation Sindoor Kirana hills attack: पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारतीय हवाई दलाने पाक लष्कराकडून अणवस्त्रांचा साठा करण्यात येणाऱ्या किराना हिल्सवर (Kirana hills) हल्ला केल्याची चर्चा रंगली होती. याबद्दल आता भारताच्या संरक्षणदलाचे माजी प्रमुख अनिल चौहान यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी (Operation Sindoor) किराना हिल्सच्या परिसरात धुराचे लोट दिसल्याने भारताने पाकिस्तानच्या न्युक्लिअर बेसच्या (Paksitan Nuclear base) ठिकाणी हल्ला केल्याच्या चर्चा होत्या. भारतीय हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एअर मार्शल एके भारती या वृत्ताचे खंडन केले असले तरी याबाबत तर्कवितर्कांना आलेले उधाण कायम आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त सीडीएस अनिल चौहान यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. ते मंगळवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबतचा सविस्तर तपशील सर्वांसमोर मांडला. (India vs Pakistan War)

भारताने पाकिस्तानच्या किराना हिल्सवर हल्ला केला होता का? असा प्रश्न विचारला जातो. यावर एअर मार्शल भारती बोलले होते. किराना हिल्सवर आम्ही हल्ला केला नव्हता, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आम्ही सरगोदार परिसरात मोठ्याप्रमाणावर आत्मघातकी ड्रोन (loitering munition) पाठवले होते. हे loitering munition आत्मघातकी ड्रोन सरगोदा परिसरातील रडारच्या शोधात होते. किराना हिल्स या सरगोदापासून उत्तरेला 10 किलोमीटर अंतरावर आहेत. आत्मघातकी ड्रोनची आयुर्मयादा ठरलेली असते. समजा दोन तासांमध्ये या ड्रोन्सना त्यांचे लक्ष्य मिळाले नाही तर ते स्वत: कुठेही आदळून नष्ट होतात. यापैकी काही loitering munition हे किराना हिल्सच्या परिसरात कोसळले असतील. याच कारणामुळे कदाचित पाकिस्तानी प्रसारमाध्यमांकडून दाखवले जात होते की, किराना हिल्सच्या परिसरातून धूर येत आहे. त्यामागे हेच कारण असावे, अशी शक्यता निवृत्त सीडीएस अनिल चौहान यांनी बोलून दाखवली.

Operation Sindoor PM Modi: ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, जमिनीवरुन गेलो होतो. पुलवामाच्या वेळी एअर रुट वापरला होता, 40 पेक्षा जास्त विमाने मोहीमेत सहभागी होती. सिंदूरमध्ये आपण वेगळा पर्याय वापरला होता, लोवर एअरस्पेसचा वापर केला. तुम्ही कोणताही पर्याय वापरता लष्करी कारवाईचा, तुम्ही एखादी रणनीती पुन्हा वापरली तर यश मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येकवेळी नवीन रणनीतीची विचार करावा लागतो. ऑपरेशन सिंदूरवेळी आपल्याकडे अनेक पर्याय होते. पाकिस्तानला धडा शिकवायचा होता. त्यांच्या विचारापलीकडची गोष्ट करायची होती. त्यासाठी लोवर एअरस्पेस वापरण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींनी फक्त एकच गोष्ट सांगितली की, आपल्यावर ही मोहीम लगेच करायचा कोणताही दबाव नाही. तुम्ही वेळ घ्या, पण मानवी किंवा तांत्रिक कारणामुळे मोहीम फसता कामा नये. तसेच या मोहीमेच्या यशाचे पुरावे हवे आहेत, असे मोदींनी सांगितल्याचे अनिल चौहान यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा

Operation Sindoor CDS Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट