PM Modi on Captain Smith Machhar: '140 करोड भारतीयांचा सन्मान उंचावला'; पंतप्रधान मोदींचा कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून संवाद, शौर्याची तोंडभरुन केलं कौतुक

4 weeks ago 4
ARTICLE AD

PM Modi on Captain Smith Machhar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी फ्लाय दुबई विमानाचे पायलट (Flydubai Incident) कॅप्टन स्मित मच्छर (Indian pilot Captain Smith Machhar) यांच्याशी फोनवर संवाद साधला. कॅप्टन स्मित यांनी आपला अनुभव आणि त्या घटने दरम्यान त्यांनी कसे धैर्य दाखवले, हे सांगितले. तसेच पंतप्रधानांनी त्यांच्या शौर्याची प्रशंसा केली आणि ते लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. स्मित मच्छर (Captain Smith Machhar) सध्या अबू धाबी येथील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, आज देश अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही भारतीय जीव घेणारे नाही, तर जीव वाचवणारे आहोत. आपण कठीण प्रसंगात आणि शरीरावर इतका मोठा आघात सहन करत आपल्या प्राणांची पर्वा न करता इतर प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतली. आज तुम्ही केवळ त्यांचे प्राणच वाचवले नाहीत, तर 140 कोटी भारतीयांचा सन्मान वाढवला आहे. तुमचं धाडस पाहून मी हृदयापासून आनंदी आहे. भरतासह संपूर्ण विश्वाला तुमचा गर्व आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांना 'हिरो' म्हणत व्हिडीओ कॉलवरून संवाद साधला.

PM Modi on Captain Smith Machhar : पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

फ्लाय दुबई विमान अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी फोनवर संवाद साधला. शुक्रवारी (२ ऑक्टोबर) बोलताना, त्यांनी स्मितच्या शौर्याची प्रशंसा केली आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. या संभाषणादरम्यान, कॅप्टन स्मितने पंतप्रधानांना आपले अनुभव आणि या घटनेदरम्यान आपल्याला कसे धैर्य मिळाले हे सांगितले. या घटनेचा एक विशेष व्हिडिओ समोर आला आहे.

पंतप्रधान मोदींनी शूर कॅप्टन स्मित मच्छर यांच्याशी फोनवर संवाद साधला. ते म्हणाले, 'संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी महामृत्युंजय पठण केले जात आहे. तुमच्या धैर्याने, प्रसंगावधानाने आणि संयमाने अनेकांचे प्राण वाचवले. देश अभिमानाने म्हणू शकतो की आम्ही भारतीय जीव घेणारे नाही, तर जीव वाचवणारे आहोत. मला खूप अभिमान वाटतो."

PM Modi on Captain Smith Machhar : तुम्ही 1.4 अब्ज देशवासियांचा सन्मान वाढवला

पंतप्रधान मोदी पायलट मच्छर यांची प्रशंसा करत म्हणाले, "तुमच्या प्रसंगावधानाने अनेक जीव वाचले. आम्ही भारतीय संपूर्ण जगाला अभिमानाने सांगू शकतो की आम्ही जीव घेणारे नाही, तर जीव वाचवणारे आहोत. तुम्हाला एवढी मोठी जखम झाली होती, तुम्ही जीवन-मरणाचा लढा देत होता आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही सर्वांचे प्राण वाचवले. तुम्ही 1.4 अब्ज देशवासियांचा सन्मान वाढवला आहे."

Captain Smith Machhar : कॅप्टन स्मित मच्छर नेमकं काय म्हणाला?

दरम्यान, पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकावर कॅप्टन स्मित मच्छर म्हणाले की , "मी पडलो होतो, पण मला वाटलं, जर मी काही केलं नाही तर..., मी उठलो नाही तर..., मी 17 वर्षांपासून विमानं उडवत आहे. जेव्हा मी पडलो, तेव्हा विमान खाली कोसळत होतं. मला माहित होतं, स्मित, हा शेवटचा जोर आहे. काहीतरी कर. दरवाजा अगदी समोर होता, आणि तरीही मला मार लागत होता. तिथे इतर सर्वांनीही तितकीच भूमिका बजावली. मी सर्वांना मरू देऊ शकत नव्हतो. मी कठीण परिस्थितीत हनुमान चालिसा म्हणत होतो. मी नेहमीच तसं करतो." पंतप्रधान मोदींचा फोन आल्यावर स्मित म्हणाला, "तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात. मला अभिमान वाटतो. त्या संघर्षात मी माझ्या जीवाची लढाई लढत होतो." यावर, पंतप्रधान मोदी म्हणाले, 'तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. देशातील आणि जगातील प्रत्येक नागरिक तुम्हाला भेटायला आणि तुमच्याशी बोलायला उत्सुक आहे. तुम्ही हनुमान चालिसेचा उल्लेख केला... त्यासाठी मी गीताबेन यांना सलाम करतो. मी तुमच्या आई आणि पत्नीशी बोललो. त्या मोठ्या धैर्याने बोलल्या. तुम्ही संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला आहे."

Flydubai Incident : कॉकपिटमध्ये काय घडलं?

कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर त्यांच्या ओमानी को-पायलटने  चाकूने हल्ला केला. इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीला विमान हायजॅक (अपहरण) करून ते क्रॅश (अपघातग्रस्त) करायचे होते. भांडणादरम्यान विमान 34 हजार फुटांवरून थेट 16 हजार फुटांपर्यंत खाली आले. वैमानिकांनी 7500 कोड पाठवला, ज्याचा अर्थ विमानात बेकायदेशीर हस्तक्षेप झाला असा होतो; यानंतर परिसरात फायटर जेट्सना अलर्ट करण्यात आले.

Read Entire Article