PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमादरम्यान भारतीय सैन्याने (Indian Army) पाकिस्तान आणि त्यांच्या हद्दीतील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या ऐतिहासिक 'सर्जिकल स्ट्राईक'च्या आठवणींना उजाळा दिला. सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्षे पूर्ण होण्याच्या अगदी आदल्या दिवशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारत आता दहशतवाद अजिबात खपवून घेणार नाही आणि शत्रूने डोळा वर करून पाहिल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.

PM Narendra Modi: जगाने पाहिली भारताची ताकद

कार्यक्रम सुरू करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी देशवासीयांचे स्वागत करतो. 'मन की बात'मध्ये आपण देशातील सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो आणि उपलब्धींची चर्चा करतो. भारताच्या अशाच एका मोठ्या आणि ऐतिहासिक कामगिरीला एका दिवसानंतर 10 वर्षे पूर्ण होत आहेत. ही कामगिरी म्हणजे 'सर्जिकल स्ट्राईक'!"

28 आणि 29 सप्टेंबर 2016 च्या त्या ऐतिहासिक रात्रीची आठवण सांगताना ते म्हणाले, "दहा वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. नियंत्रण रेषेच्या पार जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या पद्धतीने दहशतवादाविरोधात कारवाई केली, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले होते. या कारवाईने डंके की चोटवर जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवीन आणि मजबूत उदाहरण ठेवले."

PM Narendra Modi: बालाकोट ते 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांमुळे भारताने दीर्घकाळ ज्या वेदना आणि त्रास सहन केला होता, सर्जिकल स्ट्राइक हा त्या त्रासाविरोधात घेतलेला एक निर्णायक आणि कठोर निर्णय होता. गेल्या दशकात भारताच्या बदललेल्या रणनीतीचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केले की, बालाकोट एअर स्ट्राईकपासून ते 'ऑपरेशन सिंदूर'पर्यंत (Operation Sindoor) भारताने जगाला आणि शत्रूला वारंवार एकच संदेश दिला आहे - "जर दहशतवाद्यांनी भारतावर वाईट नजर टाकली, तर त्यांना त्यांच्याच भाषेत कडक उत्तर दिले जाईल."

PM Narendra Modi: 26/11 आणि जुन्या दिवसांची करून दिली आठवणी

पूर्वीच्या काळाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले, "एक वेळ अशी होती जेव्हा भारतात मालिका बॉम्बस्फोट होणे ही खूप सामान्य बाब झाली होती. सप्टेंबर महिन्यातच म्हणजेच 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या मालिका बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप नागरिक मारले गेले होते. त्यानंतर काही आठवड्यांतच मुंबईत 26/11 चा एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला होता."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "पूर्वी प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर फक्त पाकिस्तानाविरोधात कारवाई करण्याची मागणी व्हायची, पण त्यावर गंभीरतेने लक्ष दिले जात नव्हते आणि वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. मात्र, आजचा भारत दहशतवादाविरोधात 'झिरो टॉलरन्स पॉलिसी' घेऊन पुढे जात आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम आज संपूर्ण जगाला दिसत आहेत," असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Devendra Fadnavis on EVM : "ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय!"; ईव्हीएम ते निवडणूक आयोग, फडणवीसांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हणाले?