University of Chicago Crime News: अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो’च्या (University of Chicago) आवारातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थी संघटनेच्या पार्टीदरम्यान 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. एका बंद बाथरूममध्ये या तरुणीवर अत्याचार सुरू असताना बाहेर उभे असलेले काही तरुण माझा नंबर कधी येणार?, मलाही आत जायचे आहे..., असं म्हणत होते, अशी माहिती पीडितेच्या मैत्रिणीने दिली. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ऑक्टोबर 2026 च्या पहिल्या आठवड्यात वीकेंडला, शिकागो विद्यापीठाच्या कॅम्पसजवळ असलेल्या Alpha Epsilon Pi च्या घरामध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

नेमकं काय घडलं? (University of Chicago Crime News)

पीडितेच्या मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या जाहिरातीवरुन तिघी मैत्रिण सदर पार्टीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी पार्टीत नृत्य करत असताना काही वेळेनंतर पीडित तरुणी दिसेनाशी झाली. यानंतर पीडित तरुणीच्या मैत्रिणी तिचा शोध घेऊ लागल्या. याचदरम्यान त्यांनी बाथरूममध्ये आपल्या मैत्रिणीला एका अनोळखी व्यक्तीसोबत अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पाहिले. यादरम्यान बाथरूमच्या बाहेर उपस्थित असलेल्या काही तरुणांच्या गटाने मैत्रिणींना आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि ते आत चाललेल्या कृत्याचा आनंद घेत होते. तसेच तरुणीवर अत्याचार सुरू असताना बाहेर उभे असलेले काही तरुण माझा नंबर कधी येणार?, मलाही आत जायचे आहे..., असं म्हणत होते.पीडितेच्या मैत्रिणींनी हस्तक्षेप केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला.

पोलिसांनी एका संशयित व्यक्तीची ओळख पटवली- (University of Chicago Crime News)

युनिव्हर्सिटी कॅमेरे आणि इतर पुराव्यांच्या मदतीने पोलिसांनी एका संशयित व्यक्तीची ओळख पटवली आहे. त्याला विद्यापीठ कॅम्पसमध्ये येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. Alpha Epsilon Pi या राष्ट्रीय संघटनेने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कोणत्याही सदस्याला या कृत्याची कल्पना नव्हती आणि ते पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शिकागो पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Nagpur Crime News : यू-ट्यूबरवर व्हिडीओ पाहिला, औषधी वनस्पतींचे मिश्रण केले; शाळकरी मुलगा तरुणीचा गर्भपात करत बसला; पुढे थरकाप उडवणारं घडलं!