Vijay Mallya ED News : मनी लाँड्रिंग प्रकरणी (money laundering case) भारतातून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याबाबत (Vijay Mallya ) महत्वाची बातमी समोर आली आहे. विजय मल्ल्यावर बऱ्याच काळापासून मनी लाँड्रिंगचा एक खटला प्रलंबित आहे. आता ईडीने त्याच्याकडून पैसे वसूलही केले आहेत. पण तरीही हा खटला बंद करण्यास ईडीने नकार दिला आहे. त्यामुळं विजय मल्ल्याला सोडले जाणार नाही, त्याच्याभोवती ईडीकडून पुन्हा फास आवळला आहे.

विजय मल्ल्यावरील फौजदारी कारवाई समाप्त केली जाणार नाही

फरारी व्यावसायिक विजय मल्ल्यावरील मनी लाँड्रिंग प्रकरण अनेक वर्षांपासून सुरू आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना फरारी घोषितही करण्यात आले आहे. ईडीने आता मल्ल्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली असली तरी, ईडी अजूनही हे प्रकरण बंद करण्यास तयार नाही. मल्ल्या यांच्यावरील फौजदारी कारवाई समाप्त केली जाणार नाही, असे ईडीने मुंबई उच्च न्यायालयाला स्पष्टपणे सांगितले आहे.

उच्च न्यायालयात ईडीने काय म्हटले?

दरम्यान, विजय मल्ल्याचे मनी लाँड्रिंग प्रकरण अनेक वर्षांपासून सुरु आहे. या प्रकरणाची नुकतीच सुनावणी झाली आहे. या सुनावणीत, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, मल्ल्या भारतात परत येऊन न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात स्वतःला सादर करतील की नाही, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांना अंतिम संधी दिली जात आहे. ईडीने या युक्तिवादाला प्रतिसादही दिला. सुनावणीदरम्यान, ईडीने मल्ल्याच्या भारतातील अनुपस्थितीचा आणि न्यायालयात हजर न राहण्याचा मुद्दा उपस्थित केला. ईडीने म्हटले आहे की, त्याची सततची अनुपस्थिती आणि वर्तन हे चालू असलेल्या संपूर्ण कार्यवाहीच्या संदर्भात महत्त्वाचे आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, ईडीने उच्च न्यायालयाला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याचा विचार करण्याची विनंती केली आहे.

हे प्रकरण व्यावसायिक वाद नाही तर उलट, हे एक फौजदारी प्रकरण आहे. त्यामुळे, मल्ल्याकडून पैसे वसूल केल्यानंतरही, ईडीला हे प्रकरण बंद करायचे नाही. पीएमएलएच्या कलम 8 (8) अंतर्गत मालमत्तेची परतफेड ही मालमत्ता अशा व्यक्तीला परत करण्याची कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्याचे मालमत्तेमध्ये कायदेशीर हितसंबंध आहेत असे ईडीने हे स्पष्ट केले आहे. यावरून, गुन्हा किंवा मनी लाँडरिंग झाले आहे की नाही, हे आपोआप ठरत नाही.

खटला बंद करुन भारतात येण्याची परवानगी मिळावी, विजय मल्ल्याची मागणी

विजय मल्ल्याने याचिका जाखल केली होती. यामध्ये त्याने हा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला खटला रद्द करण्याची मागणी केली होती. त्याने म्हटले होते की, त्याच्या कर्जापेक्षा जास्त रक्कम आधीच वसूल झाली आहे आणि म्हणूनच, हा खटला बंद करून त्याला भारतात परतण्याची परवानगी देण्यात यावी असे यांचिकते म्हटले होते. हा खटला अनेक वर्षांपासून सुरू आहे. मल्ल्या 2016 मध्ये भारत सोडून गेला आणि तेव्हापासून तो यूकेमध्ये राहत आहे. 2019 मध्ये, त्याला या प्रकरणात फरार घोषित करण्यात आले होते.