मोठी बातमी! 270  लोकांना घेऊन जाणारी बोट अचानक उलटली, बचावकार्य सुरु, भीषण व्हिडिओ समोर

2 months ago 9
ARTICLE AD

Ship capsized News : आज दुपारी उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ धक्कादायक घटना घडली आहे. किनाऱ्यावरुन निघाल्यानंतर थोड्याच वेळात 270 लोकांना घेऊन जाणारी एक प्रवासी फेरी बोट उलटली आहे. तुर्की सायप्रसच्या माध्यमांचा हवाला देत ही बातमी देण्यात आली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, यात जीवितहानी झाली आहे की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतू, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

कॅटामरान-शैलीची फेरी सायप्रसच्या वांशिकदृष्ट्या विभागलेल्या उत्तर भागात असलेल्या किरेनिया बंदरातून, मेर्सिन प्रांतातील ताशुकचू या तुर्की बंदराकडे प्रवास करत होती. यावेळी किनाऱ्यापासून बोट सुमारे चार मैल अंतरावर गेल्यावर पाणी भरु लागले. त्यानंतर बोट उलटली आहे.  घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. तात्काळ बचावकार्य देखील सुरु करण्यात आलं आहे. तुर्कीच्या उत्तर सायप्रसच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य सेवांकडून जलद प्रतिसादासाठी सर्व आवश्यक तयारी केली जात आहे.

🚨 BREAKING: Passenger ferry sinking off the coast of Northern Cyprus

There are 279 people on board. Turkish media report that some passengers have been injured.

People are awaiting rescue on the overturned ferry, which was heading to the Turkish port of Taşucu 🇹🇷

Coast guard… pic.twitter.com/XwgpXiga9q
— NEXTA (@nexta_tv) August 30, 2026

आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

दपम्यान, उत्तर सायप्रसचे परिवहन मंत्री एर्हान अरिकली यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाज उलटल्याची घटना घडली आहे. यानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. किरेनिया येथे आणण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. किरेनिया आणि तासुकू दरम्यानच्या व्यस्त मार्गावर अनेक कंपन्या फेरी चालवतात. उलटलेली फेरी कोणत्या कंपनीच्या मालकीची होती हे अद्याप कळलेले नाही.

Read Entire Article