Devendra Fadnavis : राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात असे आशिष शेलार म्हणाले. पण आशिषजी 2019 पर्यंत उद्वजींनी जेव्हा जेव्हा मला फोन केला तेव्हा तेव्हा मी आलो. पण 2019 नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मी वाटच पाहत राहिलो असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमात शेवटचे भाषण देण्याचा फायदा हा आहे की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत .आज तरी काहीही बोललो तरी प्रतिषटकार काही येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांसाठी एक दालन उभे, राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मदत घेऊ

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित हा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला आल्याचा मला आनंद झाला आहे. व्यंगचित्रकारांच्या कार्याचा गौरव करणारी गोष्ट आहे. प्रशांत कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे राज ठाकरेंचा मला या कार्य्कर्मासंदर्भात फोन आला होता असेही मुख्यमंत्री म्हणाले. मी राज ठाकरेंना विनंती केली होती की माझं नाक मोठं काढा, पण माझं पोट मोठं काढू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांसाठी एक दालन उभे करण्यासाठी प्रयत्न करु. यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मदत घेऊ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी राज ठाकरे यांना एकदा विनंती केली होती की व्यंगचित्रात माझं पोट मोठं दाखवू नका

परिस्थितीचे आकलन करण्यासाठी अग्रलेख लिहिले जातात, अशात व्यंगचित्र काढलं तर त्याचा सारांश देखील दाखवून जातो असे मुख्यमंत्री म्हणाले. व्यंगचित्र आमच्यावर निघत असतात. आपले चित्र पाहून दुःख होतं नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. व्यंगचित्र कसेही काढले तरी चांगले वाटते. मी राज ठाकरे यांना एकदा विनंती केली होती की, माझं नाक मोठं दाखवा, पण माझं पोट मोठं दाखवू नका. आता पोट मी कमी केलं आहे, अशा आहे की इतर व्यंगचित्रकार मला सोडतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असा उल्लेख केला. सर्व लोक डाव्या बाजूला गेले म्हणून मी उजव्या बाजूला जाणीवपूर्वक आलो असेही मुख्यमंत्री म्हणाले.