Abhijeet Dipke deatin Delhi Police: दिल्लीच्या जंतर मंतरवर काही दिवसांपूर्वी प्रचंड मोठे विद्यार्थी आंदोलन उभारुन सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडणारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे शनिवारी दिल्लीत पुन्हा आंदोलनासाठी दाखल झाले. मात्र, दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) येताच तात्काळ ताब्यात घेतले. केंद्रीय निवडणूक आयोगाचे (Chief Election Commissioner of India) मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्याविरोधात अभिजीत दिपके यांच्या नेतृत्त्वाखाली सीजेपीकडून जंतर मंतर येथे आजपासून आंदोलनाला सुरुवात होणार होती. मात्र, अभिजीत दिपके यांच्या यापूर्वीच्या आंदोलनाचा धसका घेतलेल्या दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर मंतर सोडाच पण दिल्ली विमानतळावरुनच बाहेर पडण्याआधी ताब्यात घेतले.

अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर लँड होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी या परिसरात प्रचंड फौजफाटा तैनात केला होता. तेव्हाच पोलीस अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतील, अशी कुणकुण लागली होती. अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर उतरताच दिल्ली पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जलद हालचाली केल्या. अभिजीत दिपके यांचे विमान दिल्ली विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताच एक पोलीस पथक लगेच आत विमानात शिरले. यामध्ये दिल्ली पोलिसांच्या महिला अधिकारी आघाडीवर होत्या. त्यांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना काही कळायच्या आत त्यांना विमानाबाहेर पडून आपल्यासोबत चलण्यास सांगितले. या महिला अधिकाऱ्यांनी दिपकेंच्या पाठी विमानातून बाहेर पडण्यासाठी घाई लावली होती. दोन महिला पोलीस अधिकारी दिपके यांच्यासमोरच उभ्या राहिल्या. त्यामुळे अभिजीत दिपके काहीसे वैतागलेले दिसले. मला माझी बॅग तर घेऊ द्या, मी अटक करुन घेण्यासाठीच इकडे आलो आहे, असे अभिजीत दिपके यांनी वैतागून पोलीस अधिकाऱ्यांना म्हटले. मात्र, या महिला पोलीस अधिकारी अभिजीत दिपके यांना थोडीही उसंत मिळून देत नव्हत्या. अखेर दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन या सर्वांना एका बसमध्ये टाकून विमानतळाचा परिसर सोडला. आता दिल्ली पोलीस दिपके यांना किती काळ ताब्यात ठेवणार किंवा त्यांना कुठे नेऊन सोडणार, हे बघावे लागेल.

अभिजीत दिपके यांच्यासोबत दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या सौरव दास आणि आशुतोष रांका यांनाही ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी यु-ट्युबर ध्रुव राठी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. एकूणच दिल्ली पोलीस गेल्यावेळप्रमाणे सीजेपीचे आंदोलन मोठे स्वरुप धारण करणार नाही, याची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.

Delhi Protest news: दिल्ली एअरपोर्टवर नेमकं काय घडलं?

दिल्लीमध्ये जवळपास साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान रनवेवरती लँड झालं. मात्र, दिल्ली पोलिसांनी आधीच अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यासाठी रनवेच्या आजूबाजूला छावणीसारखा बंदोबस्त लावलेला होता. असं म्हणायला हरकत नाही, कारण सीआयएसएफच्या गाड्या होत्या, पोलिसांच्या गाड्या होत्या आणि दिल्ली पोलीस सुद्धा ते वरिष्ठ अधिकारी सुद्धा रनवे जवळ उपस्थित होते. आणि जसे हे विमान रनवेवरती लँड झालं, तेव्हा हे विमान थांबल्यानंतर एकाही प्रवाशाला पोलिसांनी बाहेर पडू दिलं नाही. पहिल्यांदा पोलिसांचं पथक हे विमानामध्ये घुसलं आणि अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका, हे तिघेजण एकाच आजूबाजूला बसलेले होते. तिघांनाही पोलिसांनी पहिल्यांदा ताब्यात घ्यायला सुरुवात केली. मात्र, महिला पोलीस सुरुवातीला पुढे आली, तेव्हा अभिजीत दिपके यांनी महिला पोलिसांना नाही, तर जे दुसरे मेल पोलीस आहेत, त्यांना पुढे करा. आम्ही अटक व्हायला तयार आहोत, असं म्हणून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

त्यांचं सामान सुद्धा पोलिसांनी घेऊ दिलं नाही आणि तिघांनाही विमानातून पोलिसांनी ताब्यात घेऊन बाहेर काढलं. त्यानंतर एका बसमध्ये बसवलं आणि ती बस एका वेगळ्या ठिकाणी नेण्यात आली आणि त्यानंतर प्रवाशांना एक-एक करून बाहेर काढण्यात आलं. म्हणजे सगळ्यात आधी तर विमान लँड झाल्यानंतर एकही प्रवासी बाहेर पडणार नाही, याची खबरदारी पोलिसांनी घेतलेली होती आणि आधीपासूनच त्यांना ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी केलेली होती. दिपकेंना मुंबईहून दिल्लीपर्यंत येईपर्यंत कुठल्याही पद्धतीची अडचण करण्यात आली नव्हती. कठल्याही पद्धतीचं पोलीस बंदोबस्त त्यांच्या आजूबाजूला नव्हता. ज्या हॉटेलमध्ये थांबलेले होते, तेव्हापासून ते एअरपोर्टपर्यंत कुठल्याही पद्धतीने त्यांना अडवणूक झाली नव्हती. मात्र, दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर, दिल्ली विमानतळाच्या बाहेर दिपके कसे येणार नाहीत, याची खबरदारी मात्र पोलिसांनी घेतली.

आणखी वाचा

Sanjay Raut on Delhi Protest: एक कॉकरोच सरकार को.... संजय राऊतांनी नाना पाटेकरांचा डायलॉग मारत सरकारला डिवचलं, म्हणाले...