ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑक्टोबर 2026 | रविवार

1. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी देशातील 13 कोटी मतदार वगळले, मुंबईतील गर्जना मोर्चातून उद्धव ठाकरेंचा आरोप, देशात हुकूमशाह तयार होत असेल तर त्याला इथेच गाडणार, ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/572cwt8b महाराष्ट्रातील एसआयआर रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान घ्या, राज ठाकरेंची मागणी, देशात 2017-18 पासून मतचोरी होत असल्याचा आरोप https://tinyurl.com/y2rnr55t

2. ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाला विराट गर्दी, मेट्रो सिनेमा ते बीएमसी मुख्यालयापर्यंतचा रस्ता गजबजला, मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील मोर्चात मविआची एकजूट https://tinyurl.com/usaxd925 ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांचा पलटवार, गर्जना मोर्चा नसून कोल्हेकुईचा मोर्चा, आशिष शेलारांचा टोला https://www.youtube.com/watch?v=-X26f4aeuVQ

3. विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 3 जणांची नावं जाहीर, पुणे पदवीधरसाठी डॉ. स्मिता जाधव, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे तर नागपूर पदवीधरसाठी सुधाकर कोहळे यांना संधी https://tinyurl.com/2wddztpd पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही शिवसेनेचे मंगेश चिवटे शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज भरणार, एकनाथ शिंदेंचा आदेश शिरसावंद्य असल्याचं वक्तव्य https://tinyurl.com/2k6n4m6a

4. पुणे पदवीधरसाठी भाजपकडून शिक्षण आणि उद्योगातील 'फेमस' चेहरा; कोण आहेत डॉ. स्मिता जाधव? https://tinyurl.com/sn35d35k पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी; स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे कोण आहेत? https://tinyurl.com/a5tx87dd

5. MPSC विद्यार्थ्यांना न्याय देण्याची सरकारची नैतिक जबाबदारी, मुख्यमंत्र्यांनी मागण्यांचा विचार करावा, पुण्यातील आंदोलक विद्यार्थ्यांनी भेट घेतल्यानंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला https://www.youtube.com/watch?v=colxt6bhKSk  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घेणे हे विद्यार्थ्यांचे भविष्य होऊ शकत नाही, विद्यार्थ्यांचा राजकीय वापर करू नका; मुरलीधर मोहोळ संतापले https://tinyurl.com/2jdhryvy

6. कोल्हापूरच्या 'गोकुळ' दूध संघासाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला उद्या जाहीर होणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची मुख्यमंत्री घोषणा करणार https://tinyurl.com/5c6b67xf

7. बारामतीतील सोमेश्वर कारखान्याची निवडणूक तापली, अजितदादांचं नाव न वापरता निवडणूक लढवा, सुनेत्रा पवारांचं राष्ट्रवादीच्या बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांना आव्हान, तर अजितदादा सभासदांच्या मनामध्ये, तिथून कसे काढणार? जगतापांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/y77ze5r7 अजितदादांचा समावेश हा महापुरुषांच्या यादीत, त्यामुळे त्यांचा फोटो वापरणारच, बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचे निवडणूक आयोगाला पत्र लिहित उत्तर https://tinyurl.com/3uw643sv

8. मराठवाड्याला दुष्काळाची झळ, बांधावरचा दुष्काळ थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत, उत्पन्नापेक्षा खर्च अधिक, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर म्हशी विकण्याची वेळ https://tinyurl.com/357f2psk दुष्काळामुळे पीक गेलं, मुलीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होईना, बीडमधील शेतकऱ्याने गळ्याला दोर लावला https://tinyurl.com/4wuw3ajb

9. भरधाव ट्रेलरची जबर धडक, दुचाकीवरील पती-पत्नी अन् एका चिमुकल्याचा घटनास्थळीच दुर्दैवी अंत, नागपूरच्या जामठा गावाजवळील घटना https://tinyurl.com/3jxm3w2b घरच्यांना शेवटचा कॉल अन् 37 वर्षीय तरुणाने किल्ले रायगडाच्या टकमक टोकावरून स्वतःला झोकून दिलं, अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश https://tinyurl.com/mrxnkxu4

10. श्रीनगरमध्ये खेळल्या गेलेल्या इराणी कप 2026 च्या अंतिम सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून जम्मू-काश्मीरचा 167 धावांनी पराभव https://tinyurl.com/4rh4buur एकदिवसीय मालिकेनंतर आता वेस्ट इंडिजविरोधात टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज, 6 ऑक्टोबर रोजी लखनौत पहिला सामना, टीम इंडियामध्ये बदल शक्य https://tinyurl.com/3np4h55y

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w