ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 सप्टेंबर 2026 | शुक्रवार

1. मराठा आरक्षण उपसमितीला जीआर काढण्याचे अधिकार कुणी दिले? आम्हीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, छगन भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल, सरकार आणण्यात ओबीसींचा हातभार असल्याचाही घरचा आहेर https://tinyurl.com/8m2z56mh जात पडताळणी समितीवर कोणी दबाव आणत नाही, ओबीसींचं वाटोळं केलं, महाराष्ट्र सदनात भ्रष्टाचार केला, आता राजकारण करु नका, मनोज जरांगेंचं भुजबळांना उत्तर https://tinyurl.com/4xz9j55b

2. सोलापुरात गणेशोत्सवात साऊंड सिस्टिम आणि लेझरवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश, नियम मोडल्यास कारवाई होणार https://tinyurl.com/rccpn7f6 तुम्ही कितीही बंदी घाला, कारवाई करा, DJ वाजवणारच, नागपुरात दहीहंडी आयोजकांचं थेट आव्हान https://tinyurl.com/84skm28j

3. डीजेविरोधातील भूमिकेवर विद्यानंद बापट ठाम, मांडलेल्या मुद्द्यावर प्रतिवाद करा, मागे हटेन, बापटांचं आव्हान, जिवंत राहिलो तर रविवारच्या मोर्चात सहभागी होईन, बापटांची उपहासात्मक टीका https://tinyurl.com/3598z8by भावना दुखावल्याच्या प्रकरणी विद्यानंद बापटांविरोधात पुण्यातील गणेश मंडळे तक्रार दाखल करणार, तर भावना म्हणजे छाती किंवा डोकं नाही दुखायला, बापटांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/bp8ba496

4. मराठवाड्यात दुष्काळाचं सावट अधिक गडद, उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ, स्वतंत्र पॅकेज जाहीर करण्याची मागणी https://tinyurl.com/ymw5c7ax

5. MPSC पेपरफुटी प्रकरण, अमरावतीत हजारो विद्यार्थ्याचा एल्गार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा https://tinyurl.com/3wuejz4s

6. महाराष्ट्राचे केंद्राकडे 3 हजार कोटी अडकले, ते पैसे आल्यानंतर ठेकेदारांची प्रलंबित बिले दिले जातील, मंत्री भरत गोगावलेंचं पंढरपुरात मोठं वक्तव्य https://tinyurl.com/skn837aa

7. धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारून राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या, घटनेत दोन मुलांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर, सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप https://tinyurl.com/yzz3wkrt लग्न झाल्यानंतर त्रास सुरू झाला; नवरा पगार घ्यायचा, ते मटण खायचे अन् मुलीला उष्ट अन्न द्यायचे, धाराशिवच्या कुस्तीपटू अश्विनीच्या वडिलांनी सांगितली आपबिती https://tinyurl.com/yp8ypxcj

8. कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, मुंबईतील आग्रीपाड्यातील घटना https://tinyurl.com/5e9nsw8f चिमुरडीला आईस्क्रीम खाण्याचं आमिष दाखवलं अन् 51 वर्षांच्या आरोपीनं नको ते केलं, पुण्यातील घटनेनं खळबळ https://tinyurl.com/y45ptytz

9. ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली, नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत https://tinyurl.com/3j3k8ve9 लग्नानंतर 11 महिन्यात छळाला सुरूवात, एका लाखासाठी शारिरीक अन् मानसिक त्रास, पाच महिन्यांच्या गरोदर विवाहितेनं गळ्याला लावला दोर, पुण्यातील इंदापूरमधील घटना https://tinyurl.com/y87p3h45

10. वयाच्या खोट्या नोंदी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीसीसीआयची 62 खेळाडूंवर दोन वर्षांसाठी बंदी https://tinyurl.com/2s3ns5ea आशियाई गेम्सपूर्वी BCCIची मोठी घोषणा, 22 सप्टेंबर रोजी भारत आणि जपानमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक टी-20 सामना https://tinyurl.com/y8savzpt

एबीपी माझा स्पेशल

विद्यानंद बापट नास्तिक कधी बनले? कोणत्या लेखकांच्या पुस्तकांचा प्रभाव? विद्यानंद बापट यांनी कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात नास्तिक होण्याचा प्रवास मांडला... https://tinyurl.com/kyhm52z6

डीजे बंदीची मागणी अन् मारहाण, विद्यानंद बापट यांची Exclusive मुलाखत https://www.youtube.com/watch?v=I5A2cv1qwRg

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w