ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 सप्टेंबर 2026 | बुधवार

1. मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, उपचार घेतले नाही तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, डॉक्टरांचा इशारा https://tinyurl.com/2s2cfymm मनोज जरांगेंचे वडील लेकाकडे एकटक पाहत बसले, खाली वाकून मायेने कवटाळताच अश्रूंचा बांध फुटला https://tinyurl.com/3pfh8rf3

2. मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आतताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा अशी भाषा वापरणार नाही, मंत्री आशिष शेलारांची टीका, सणामध्ये उपोषण न करण्याचं आवाहन https://tinyurl.com/y39avsyy मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात एमी फाऊंडेशनची हायकोर्टात याचिका, परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार https://tinyurl.com/zntzz3w6

3. ना दिशा सालियनला कधी भेटलो, ना तिच्याशी ओळख, अफवांचा धुरळा उडवणं बंद करा, आदित्य ठाकरेंची 6 वर्षांनी पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/4sjewbjy दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयच्या पोलीस अधीक्षक सीमा पाहुजा यांच्याकडे, सीमा पाहुजांना हाथरस, उन्नाव आणि पश्चिम बंगालमधील आर जी कर हॉस्पिटल प्रकरणांच्या तपासाचा अनुभव https://tinyurl.com/234evwzj

4. शिवसेना वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखं उद्धव ठाकरे वागले, त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा सोडल्यानेच पक्षात फूट, एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद, शिवसेना शिंदेंना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्यच असल्याचा दावा https://tinyurl.com/53pmv66p

5. डिजिटल पेमेंट प्रणालीची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल, दोन हजारांहून अधिकच्या रकमेच्या UPI व्यवहारांवर कर लावण्याच्या निर्णयाचं RBI कडून समर्थन https://tinyurl.com/5n8fvw8z  Gpay पासून PhonePe पर्यंत... कोणकोणत्या UPI पेमेंटच्या किती रुपयांवर किती शुल्क लागणार? https://tinyurl.com/2jufkv7m

6. EPFO ने PF साठी मूळ वेतनाची मर्यादा 25,000 रुपयांपर्यंत वाढवण्यास केंद्राची मंजुरी, तब्बल 12 वर्षांनी नियमात बदल, 51 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा https://tinyurl.com/38kpsr9y

7. केवळ 11 रुपये किमतीची वस्तू 325 रुपयांना विकली जाते, 6.75 किमतीच्या सिरिंजची किंमत 57.20 रुपये, FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी हॉस्पिटलमधील लुटीचा एक्स-रे काढला https://tinyurl.com/c28pefhr

8. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मुंबईकडे परत जात असताना एर्टिगा कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 4 ठार, 6 जण गंभीर जखमी https://tinyurl.com/3y3j3evh समुद्राच्या पाण्यात गेलेला बॉल आणायला गेला तो परतलाच नाही, वसईच्या सुरुची बीचवर नायगावचा 15 वर्षीय अंकित बेपत्ता, 72 तासांनंतरही शोध सुरू https://tinyurl.com/3vcc9pv6

9. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धनौका अरबी समुद्रात एकमेकांना धडकल्या, पाकिस्तानकडून 35 वर्षे जुन्या कराराचा भंग, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली https://tinyurl.com/4s85frzn

10. संजू सॅमसनच्या वादळी खेळीने अफगाणिस्तानचा धुव्वा, दुसरा टी20 सामना भारताने सात विकेट्स राखून जिंकला, तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी https://tinyurl.com/w9e8hjkf

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w