ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2026 | सोमवार

1. आपण कुठेही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या, शरद पवारांच्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना उधाण, राष्ट्रवादीचे विलिनीकरण, एनडीएसोबत जाण्याच्या चर्चांवर पवारांची भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/yrazfr4z राष्ट्रवादीचे विलिनीकरण एकाच मुद्द्यावर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला उद्देशून वक्तव्य https://tinyurl.com/wnm6ucev शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काळाच्या ओघात समजेल, आम्ही एनडीएसोबतच राहणार, पवारांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ybxcx8jz

2. अजित पवारांच्या विमान अपघातावर व्हीएसआर कंपनी आणि त्यामागच्या सूत्रधाराची माहिती 10 ऑक्टोबरला पुराव्यासह समोर आणणार, रोहित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/25sfayww यंदा दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करा, शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचं कळकळीचं आवाहन, राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अन्यथा समृद्धी महामार्ग अडवू, रोहित पवारांचा सरकारला 12 दिवसांचा अल्टीमेटम https://tinyurl.com/yaut5ujz

3. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, अमरावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा https://tinyurl.com/4v3jjfbn

4. कारवाई, छापे यांचा धाक दाखवून एफडीएतील काही अधिकारी व्यावसायिकांना लुबाडत असल्याचा आरोप, खासदार संजय राऊतांचे आयुक्त तुकाराम मुंढेंना पत्र https://tinyurl.com/4hcma8ru

5. मनोज जरांगे पाटलांच्या सहकाऱ्यांवर कारवाईचा बडगा, कोअर कमिटीतील सदस्याला वाळू उत्खनन प्रकरणात 4 कोटी 90 लाखांचा दंड https://tinyurl.com/mvknzxwd आपल्याला एकटं पाडण्याचा आणि त्रास देण्याचं षडयंत्र, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, मराठा आरक्षणासाठी सरकारला 3 महिन्यांचा वेळ, सहकाऱ्यांना त्रास देण्याऐवजी समाजाच्या मागण्यांवर काम करा, जरांगेंचा सल्ला https://tinyurl.com/ybkybpru

6. लग्नासाठी 45 लाख खर्च केले, 10 तोळे सोनं दिलं, तरीही चारचाकीसाठी 5 लाख आणण्याचा तगादा, सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात IT इंजिनिअर विवाहितेने जीवन संपवलं https://tinyurl.com/4vns3bw6 सततची नापिकी, कर्जाचा वाढता भार अन् त्यात दुष्काळ, बळीराजाच्या संयमाचा बांध फुटला, राबत्या शेतात जीवन संपवलं, अमरावती हादरलं https://tinyurl.com/4t7xfefw

7. शेअर बाजाराच्या बहाण्याने महिलेच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला, नंतर अश्लील व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं, नाशिकमध्ये विवाहितीने जीवन संपवलं https://tinyurl.com/yw74ftyk चारचाकी वाहनाने बाजूने कट मारताच दुचाकी कठड्याला धडकली, जळगावात पुलावरून खाली पडून ज्योतिषाचा मृत्यू, मुलगी थोडक्यात बचावली https://tinyurl.com/4nhbpabk

8. शेअर बाजारात ब्लॅक मंडे, सेन्सेक्स 1124 अंकांनी तर निफ्टी 360 अंकांनी घसरला, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले https://tinyurl.com/yc4278bs

9. अभिनेत्री रकुलप्रीत सिंह, निर्माता वाशू भगनानी, पॅनोरमा स्टुडिओजशी संबंधित ठिकाणांवर आयकर विभागाचे छापे, 12 ठिकाणी आयकर विभागाचा कसून तपास, सिनेमांच्या नावाखाली परदेशात अवैधरित्या पैसे पाठवल्याचा संशय https://tinyurl.com/wcp5csur

10. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अफगाणिस्तानविरोधातील सामना पावसामुळे रद्द, क्रमवारीत अव्वल स्थान असल्याने भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश https://tinyurl.com/d2srwe5r रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला, विराट कोहली काळजीनं पाहात राहिला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/2n2m6m3a

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w