ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2026 | गुरुवार

1) 'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं गोव्यात निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://tinyurl.com/yck3u9n4 नाना पाटेकरांना मध्यरात्री छातीत तीव्र वेदना, रात्री अडीच वाजता मित्राला मेसेज, डॉक्टरांकडून 45 मिनिटं सीपीआर, मात्र त्यांना वाचवण्यात अपयश, गोव्यातील डोना पावलामधील घरी काय घडलं? डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती https://tinyurl.com/2ke38tyw

2) नाना पाटेकर अभिनयाकडे कसे वळले? 35 रुपये कमाई, एक वेळेचं जेवण, डोळे पाणावणारा संघर्ष, कारगिल युद्धातही बजावली सेवा https://tinyurl.com/4dp93xub पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बॉम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी https://tinyurl.com/ywjf9r4s

3) नाना पाटेकर यांच्यावर पुण्यातील डोणजे गावात आजच अंत्यसंस्कार होणार, लाडक्या नटसम्राटाला शासकीय इतमामात निरोप देण्यात येणार https://tinyurl.com/yv9cfwry नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, नामचे सीईओ ढसाढसा रडले, शेतातच अंत्यसंस्कार करण्याची नटसम्राटाची शेवटची विनंती https://tinyurl.com/m3adrjyf

4) करारी अभिनेता आपण गमावला, नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक https://tinyurl.com/585rjzb5 नाना पाटेकरांचं निधनानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार भावूक; डोळे पाणावणाऱ्या प्रतिक्रिया https://tinyurl.com/2f8uyjek

5) नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू https://tinyurl.com/yp9h3f65 नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले https://tinyurl.com/4vxpfueu

6) नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली, अक्षय कुमार, रितेश देशमुख ते रवि किशन, कलाकारांच्या डोळे पाणावणाऱ्या पोस्ट https://tinyurl.com/yeyrad4m माझा मित्र गेला, आयुष्यातली अत्यंत वाईट गोष्ट, नाना पाटेकरांच्या जाण्यानं अशोक सराफ भावूक, आठवणींना दिला उजाळा https://tinyurl.com/3b5y7sbc नाना पाटेकर म्हणजे अत्यंत स्पष्टवक्ते आणि जमिनीशी जोडलेले व्यक्तिमत्त्व, त्यांचं कार्य आणि वारसा पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील, क्रिकेटर सचिन तेंडूलकरसह विराट कोहलीकडून दु:ख व्यक्त https://tinyurl.com/4czf2uya

7) ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत राडा सुरूच, राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक, तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त https://tinyurl.com/56a5n9b9 ज्ञानेश कुमारांच्या समर्थनार्थ 42 निवृत्त न्यायाधीश-अधिकारी मैदानात, SIR प्रक्रियेचं समर्थन, देशवासियांना खुलं पत्र https://tinyurl.com/yzzmpcbu MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली https://tinyurl.com/3jzhhs8n

8) शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं? https://tinyurl.com/42m4tbtj एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? उमेदवार उभा करता आला असता, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/nhtn2f33

9) युगेंद्र पवारांनी सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं, जय पवारांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा ठेवली होती https://tinyurl.com/mt5m8ub5

10) मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/bxsvt8ek पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं https://tinyurl.com/4er3hfaz

एबीपी माझा स्पेशल

'नटसम्राट' ते 'जननायक'चा प्रवास करणारा आपला माणूस गमावला! https://tinyurl.com/46kwhd9u
दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नाना पाटेकर यांचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही https://tinyurl.com/54dpkmch वय वाढत असताना कार्डियाक अरेस्ट धोका शकतो, 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी? https://tinyurl.com/mmh2hej

एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658