Ajay Baraskar on Manoj Jarange : 19 दिवसांनंतर जरांगेंनी उपोषण स्थगित; अजय बारस्कर म्हणाले, 'मनोज जरांगे उपोषण सोडण्यासाठी सरकारच्या हातापाया....'

1 month ago 7
ARTICLE AD

मुंबई :  मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी आज (17 सप्टेंबर) उपोषण स्थगित (Manoj Jarange Patil Protest) करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी  (Manoj Jarange)90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर आता अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर टीका करत म्हटलं की, मनोज जरांगे उपोषण सोडण्यासाठी सरकारच्या हातापाया पडत होते. पांडुरंग तारक नावाच्या व्यक्तीची आम्ही इडीकडे तक्रार केली आहे. इडीची चौकशी थांबावी म्हणून हे आंदोलन करण्यात आलं आहे. तारक नावाच्या व्यक्तीने जो काहीच काम करत नाही त्याने २७ एकर जमीन खरेदी केलीच कशी हा सवाल आम्ही उपस्थित केला आणि त्यानंतर ईडी(ED)कडे तक्रार देखील केली. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, औंध गॅझेट उपयोगाचे नाही. उलट यामुळे आमचे बांधव अडचणीत येतील. कारण परभणी जातपडताळणी कार्यालयाने हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला नकार दिला आहे. २१ हजार जे काही प्रमाणपत्र दिले आहेत ते हैदराबाद गॅझेटच्या आधारे नाहीत. मराठा समाजाला भावनिक करून केवळ स्वतःची संपत्ती वाढवण्याच काम जरांगे करत आहे. याला समाजाने बळी पडू नये केवळ २ समाजात भांडणे लावण्याच काम जरांगे करत आहे.

मराठा आरक्षणाचे अभ्यासक अजय बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर तीव्र टीका करत 'ते उपोषण सोडण्यासाठी सरकारच्या हातापाया पडत होते' असा आरोप केला आहे. अजय बारसकर म्हणाले की, मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण मागे घेतले आहे. याआधीही त्यांनी अनेकदा उपोषणे मागे घेतली आहेत, पण प्रत्येक वेळी उपोषण सोडल्यानंतर नेमके काय मिळाले? असा प्रश्न निर्माण होतो.बारसकर पुढे म्हणाले, "वाशीच्या आंदोलनातून समाजाला काय मिळाले? तुमच्या शेजारच्या लोकांना तर काहीतरी नक्कीच मिळाले असणार, ज्याचा शोध घेऊन आम्ही ते मुळासकट बाहेर काढणारच आहोत, पण सामान्य समाजाला आज काय मिळाले, हा खरा प्रश्न आहे. गेले तीन वर्षे मनोज जरांगे महाराष्ट्रात उपोषणाच्या नावाने धंदा करत आहेत आणि हा धंदा आम्ही ईडीकडे तक्रार करून उघडकीस आणला आहे. उपोषण करायचे, ते ताणायचे आणि काहीतरी थातूरमातूर आश्वासने घेऊन ते सोडायचे, हाच यांचा प्रकार सुरू आहे."२३ डिसेंबर २०२३ च्या बीडमधील निर्णायक बैठकीची आठवण करून देत बारसकर म्हणाले की, "त्यावेळी 'सरकारला एक तासाचाही वेळ मिळणार नाही' असे वक्तव्य करणाऱ्या जरांगेंनी आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतर पुन्हा तीन महिन्यांचा (90 दिवसांचा) वेळ दिला आहे. हे नेमके काय चालले आहे? हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि अभ्यासाच्या गप्पा मारून मनोज जरांगे पूर्ण महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत आणि मराठा समाजाची फसवणूक करत आहेत, हे आज सिद्ध झाले आहे."उपोषण मागे घेण्याच्या कारणांवर भाष्य करताना ते म्हणाले की, समाजाला काहीही मिळालेले नसताना केवळ आश्वासनांवर उपोषण सोडले गेले. पडद्यामागची गोष्ट सांगताना त्यांनी आरोप केला की, "आमच्यावरील ईडीच्या चौकश्या थांबवा, वाळू आणि इतर प्रकरणांतील चौकश्या बंद करा आणि मला सन्मानजनकरित्या यातून बाहेर पडू द्या, अशी गयावया करत जरांगे विखे पाटील आणि लाड यांच्या पाया पडले होते. केवळ ईडीच्या धाकामुळेच जरांगेंनी हे उपोषण सोडले आहे."

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज (17 सप्टेंबर) उपोषण स्थगित (Manoj Jarange Patil Protest) करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी. 58 लाख नोंदींमधील एकही नोंद कमी व्हायला नको...नोंदी कमी करणार नाही, याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. तसंच मुंबईत गेलेल्या 1 लाख 07 हजार समर्थकांनी माघारी यावं असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी केलं आहे. बीडच्या पाटोद्यात सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर जरांगेंनी सरकारवर तीन महिने विश्वास ठेवण्याची तयारी दाखवली.

आज सकाळी 5 वाजता सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी बीडमधील पाटोदा येथे दाखल झालं होतं. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. जवळपास 1.30 तास मनोज जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळ यांच्यात चर्चा झाली. यावेळी मनोज जरांगे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मराठा समाजाला खुन्नस देणं चांगलं नाही. चर्चा न करणारे आज चर्चेसाठी आले की नाही?, आरक्षणापेक्षा समाजाची इज्जत महत्वाची आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) माझे वैरी नाहीत. पण समोरुन वार आलं, तर काय करणार?, असा सवालही मनोज जरांगेंनी उपस्थित केला. तसेच राधाकृष्ण विखे चुकत असले तरी त्यांच्यावर प्रेम करा. एकनाथ शिंदेंवरही प्रेम करु पण आता नाही. मंत्र्यांनी टीका केली तर आम्ही गप्प बसणार नाही, असंही मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं.

Read Entire Article