<p>Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं</p>
<p>मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यात विविध गणेश मंडळांना भेटी देऊन बाप्पाचे दर्शन घेतले. डोक्यावर पारंपरिक फेटा बांधून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते. जुन्या काळात जसा गणेशोत्सव साजरा व्हायचा, तसाच पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय, असा आनंद त्यांनी व्यक्त केला. तसेच, डीजे ऐवजी ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांचीच आपल्याला आवड असल्याचे त्यांनी सांगितले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आणि तरुणांनी अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. "हे लोकांचे प्रेम आहे आणि मी नशीबवान आहे," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी एबीपी माझाशी बोलताना दिली.शेतकऱ्यांच्या आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, "मी फक्त मंदिरात येऊनच नाही, तर ३६५ दिवस देवाकडे प्रार्थना करत असतो. पण केवळ प्रार्थना करण्यापेक्षा मैदानात उतरून लोकांचे प्रश्न सोडवणे मला अधिक महत्त्वाचे वाटते. देवाचं माझं एक वेगळं नातं आहे, तर यावेळी राज ठाकरेंसाठी काय प्रार्थना केली असे विचारले असता, "राज साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे," अशी प्रार्थना त्यांनी गणरायाकडे केल्याचं एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.</p>