Amol Khune On Manoj Jarange: कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं

1 month ago 6
ARTICLE AD

मुंबई :  मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी आज (17 सप्टेंबर) उपोषण स्थगित (Manoj Jarange Patil Protest) करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी  (Manoj Jarange)90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केलंय, मात्र आंदोलन सुरुच राहणार, असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं. मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून त्यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी अनेक आरोप करत निशाणा साधला आहे.

माध्यमांशी बोलताना अमोल खुणे म्हणाले की, ह्या आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे घेता येत नाही. पण, ईडीच्या चौकशीमध्ये सगळं बाहेर येईल, कुणी रसद पुरवली कोणी पैसे दिले. मी कुठल्या मंत्र्याचं आमदाराचं, खासदाराचे नाव घेऊ शकत नाही. या गोष्टी ईडीच उघड्या पाडणार आहे. अब्दुल सत्तार यांनी याला 6 कोटी दिल्यामुळे यांनी संजय शिरसाटांना टार्गेट केलं. अब्दुल सत्तारांना संभाजीनगरचा पालकमंत्री व्हायचं आहे. सामाजिक न्यायमंत्र्याचे पद सत्तारांना घ्यायचा आहे.शिरसाट यांना टार्गेट करायची सत्तारांकडून सुपारी घेतली आहे. हे पैसे कोणी आणले, कसे आणले, कुठे ठेवले, हे सगळं ईडीच्या चौकशीत समोर येणार आहे. मी तुला 80-90 टक्के उघड पाडलं आहे, तुझा जय हिंद, जय महाराष्ट्र, नक्की होणार आहे. पुढच्या उपोषणाला शिष्टमंडळ येणार नाही, कुठला मंत्री येणार नाही, हे मी आत्ताच सांगतो, तू एखाद्या महाराजाकडून नाहीतर गावातल्या माता माऊलीकडून पाणी पिऊन उपोषण सोडणार आहेस. याची लायकी काय हे पाटोद्यामधूनच लोकांना कळलं, जनतेला कळलं याच्याकडून न्याय भेटणार नाही. हा बारावा उपोषण करणार आणि तिथेच संपणार बाराव्या उपोषणाला याचे बाराच वाजणार आहेत, असंही खुणे पुढे बोलताना म्हणालेत.

हा शिष्टमंडळाच्या हातापाय पडला. शिष्टमंडळाने काहीच दिलं नाही. पाटोद्यातून हे पुढे सरकले असते तर गंगाधर काळकुटे आणि श्रीराम कुरुंदकरला ईडी उचलणार होती. गंगाधर काळकुटेनी माझा कार्यक्रम लागला म्हणून सगळ्यांना फोन केले होते. गेवराई पर्यंत साधारण होता, गेवराईनंतर तंबाखूच्या पिचकारी मारल्या, गाड्या बाजूला काढण्यासाठी शिव्याही दिल्या, ही एनर्जी कुठून येती?पब्लिक समोरच नाटकं केले धरायला चार जण असायचे, मराठ्यांचा इतिहास आहे, एवढ्या लढाया झाल्या,युद्ध झाले, एक तरी मावळा कुठल्या मोहिमेवर रडत गेला का? हा प्रत्येक लढाईला रडत जातो. खिंड लढवायला हा बाजीप्रभू लागून गेला का? हे नाटक कुठेतरी थांबलं पाहिजे असंही पुढे अमोल खुणे यांनी म्हटलं आहे.

Amol Khune On Manoj Jarange:  हे माझ्यावर का बोलत नाहीत?

"मी एवढं बोलतोय, सर्वच टीमवर, मनोज जरांगेवर. हे का माझ्यावर बोलत नाहीत? यांच्यात धमक नाही. मनोज जरांगे जर खरे असतील, तर मनोज जरांगेने माझ्यासमोर बसावं आता समोरासमोर बोलावं. मग मी सांगतो मनोज जरांगेने काय केलंय आणि मनोज जरांगेने सांगावं आता अमोलने काय केलंय. मी जर कुठे चुकीचा ठरलो, तर मला समाज जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे आणि मनोज जरांगे जर चुकीचा ठरला, तर समाजाने जी शिक्षा दिली ती मनोज जरांगेने स्वीकार करावी. मी तरी स्वीकारतो. मी जर कुठे चुकलो असल, कोणाच्या एक रुपयात मिंधा असेल तर. मी ह्यांच्यासारखा नाही, हजारो कोटीची प्रॉपर्टी माया गोळा केली, समाजाच्या नावावर दलाल्या करून, आणि ते मी करणारही नाही. कारण मी ९६ कुळी मराठा आहे, खानदानी पाटील आहे. माझ्या रक्तात गद्दारी नाही. मी शेतात कष्ट करून पोट भरणारा माणूस आहे. समाजाच्या नावावर हाय का दलाली करणारा माणूस मी नाही, असंही खुणेंनी म्हटलं आहे.

मी जर चुकीचा असेल ना, या सर्वच तुमच्या टीमने, मनोज जरांगेने ह्यांनी सर्वांनी, मी त्यांच्यावर एवढं बोलतोय. त्यांचं एवढं मी सर्व उघडं पाडलंय. मी जर चुकीचा असेल तर माझ्यावर हे अब्रूनुकसानीचा दावा का टाकत नाहीत? टाका ना अब्रूनुकसानीचा दावा. ज्या दिवशी अब्रूनुकसानीचा दावा टाकताल, त्या दिवशी तुम्हाला माहितीये की, आम्ही संपलोत म्हणून. कारण अब्रूनुकसानीचा दावा टाकला तर तुमच्या मागे १०० टक्के सर्व यंत्रणा लागणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही टाकूच शकत नाहीत. अब्रूच कुठे गेलेली नाही, तर तुम्ही का अब्रूनुकसानीचा दावा माझ्यावर कसा टाकाल? अब्रू तुमच्या गेलेल्या आहेत. अब्रू माझी नाही गेलेली. ज्या दिवशी माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकताल, त्या दिवशी तुमची अब्रू जाणार आहे सर्वांची. मग त्या वेळेला तुम्हाला पळता भुई होईल" असंही मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खुणे, यांनी म्हटलं आहे.

Amol Khune On Manoj Jarange: जरांगे बायकोच्या गळ्यात पडून रडले

आतापर्यंत युद्ध झाले मोहिमेवर गेले, कोणता राजा बायकोच्या गळ्याला धरून रडला सांगा बरं, हे कसला राजा, मला खुदागवा पिक्चर आठवला, त्यातलं गाणं आजा ओ मेरे बादशाह, एक वादे के लिए. मनोज जरांगे यांनी आता थांबवावं समाजाला भावनिक करू नये. अकरा वेळेस त्याने बायकोचे कुंकू पुसलं, किती त्या माऊलीची फसवणूक केली. आलो तर तुझा, गेलो तर समाजाचा, असं सांगायचं कुंकू पुसायला तयार रहा, खरं कुंकू साडेतीनशे मुलांच्या आत्महत्या नंतर पुसलं गेलं, यांना भावनिक तू केलंस, या आत्महत्या केलेल्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 99 टक्के आंतरवेली अमोल खुणेंची आहे, उरलेल्या एक टक्क्यांमध्ये दादा घाडगे, बद्री तारख, पांडू तारख, विजू तारख हे यामध्ये येतात, असंही पुढे खुणे म्हणालेत.

Read Entire Article