Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली

2 months ago 10
ARTICLE AD
<p>Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली</p> <p>अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे भीषण आग लागली. येथील नवजात शिशु कक्षात ही आग लागली. त्यामध्ये तीन लहान बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाली आहे. तर या कक्षात असलेल्या सहा अर्भकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशु अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरमध्ये अचानक स्फोट झाला. त्यामुळे लागलेली आग अतिदक्षता विभागात वेगाने पसरली. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या कक्षातील बालकांना वेगाने बाहेर काढले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एकूण तीन नवजात शिशु अतिदक्षता कक्ष आहेत. या तीन कक्षांमध्ये प्रत्येकी 13 अशी मिळून 39 नवजात बालकांवर उपचार घेण्याची क्षमता आहे. यापैकी एका कक्षात आग लागली. या कक्षात एकूण 12 बालके होती. आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर / नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी या कक्षातील लहान बाळांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तीन बालकांचा धुरामुळे गुदमरुन मृत्यू झाला.</p>
Read Entire Article