Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित 'सैराट'नं (Sairat Marathi Movie) सिनेसृष्टीत इतिहास घडवला आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या सिनेमातल्या प्रत्येक पात्राला विशेष ओळख मिळाली. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Akash Thosar), तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. यांच्यासोबत आणखी एक पात्र खूप गाजलं, ते म्हणजे 'सैराट'चा सल्या. अरबाज शेख यानं 'सैराट' (Sairat) या सिनेमात 'सल्या'ची भूमिका साकारलेली. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्यानं एक व्हिडीओ शेअर करुन वडिलांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलेलं. त्याचप्रमाणे, त्यानं रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरही भाष्य केलेलं. अशातच त्यानं नुकताच एक व्हिडीओ शेअर करुन तुकाराम मुंढेंचे आभार मानले आहेत.

'सैराट' फेम सल्या म्हणजेच, अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालंय. पण त्यापूर्वी त्यानं रुग्णालयामध्येच अॅडमिट असताना एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये हॉस्पिटल प्रशासनाकडून पैशांची लूट होत असल्याचा दावा केलेला. अशातच आता, त्यानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरबाज शेखनं सांगितलंय की, ज्यावेळी त्यानं व्हिडीओ शेअर केलेला, त्यावेळी एफडीएकडून तात्काळ कारवाई करण्यात आलेली. त्यामुळे अरबाजनं व्हिडीओ शेअर करुन तुकाराम मुंढेंचे आभार मानले आहेत. तसेच, रुग्णालयांच्या भोंगळ कारभाराबाबत सुरू असणाऱ्या चर्चा, त्याचप्रमाणे वारंवार समोर येणाऱ्या तक्रारी निदर्शनास आणूल दिल्यात. तसेच, या गैरप्रकारांवर कारवाई करण्याचं आवाहनही केलंय.

'सैराट' फेम अरबाज शेख तुकाराम मुंढेंबाबत काय म्हणाला?

'सैराट' फेम अरबाज शेख रुग्णालयं आणि त्यांच्यासंदर्भात वारंवार समोर येणाऱ्या तक्रारींवर तपास करुन कारवाई करण्याची विनंती केलीय. अभिनेता अरबाज शेख म्हणाला की, "थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब... रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराच्या तक्रारी यापूर्वी अनेक लोकांनी केल्या, पण त्या तक्रारींवर तातडीनं ॲक्शन घेण्याची भूमिका ही तुम्हीच घेतली, यासाठी खरंच धन्यवाद... मेडिकल सेक्टरमध्ये काही ठिकाणी होणाऱ्या लुटीबद्दल आपण बोलतो, पण त्यामध्ये हॉस्पिटलची काही भूमिका आहे का? याचाही तपास होणं गरजेचा आहे... डॉक्टरांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे पेशंट रेफर केल्यावर, कमिशन मिळत असल्याचे आरोप... ॲम्बुलन्सचे पैसे... सिटीस्कॅन रेफरमधील कथित कमिशन या सर्व गोष्टींची पारदर्शक चौकशी होण्याची गरज आहे..."

"किती हॉस्पिटल्स नियमांनुसार रजिस्टर आहेत आणि किती नाहीत, याचीही तपासणी झाली पाहिजे... माझ्या कुटुंबासोबतही असा प्रसंग झालेला आणि त्यावेळी तुम्ही कारवाई केली, त्यासाठी मी वैयक्तिकरित्या तुमचा आभारी आहे, महाराष्ट्राला तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची खूप गरज आहे... थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...", असं अरबाज शेख म्हणाला आहे.