Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातची न्यायालयीन कोठडी वाढली; पत्नी कल्पना खरातला सशर्त जामीन, कोर्टात काय घडलं?

1 month ago 6
ARTICLE AD

Ashok Kharat Nashik Crime News: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. अशोक खरातवर 47 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार, लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिला विशेष न्यायालयाकडून 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि परदेशबंदीच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने कल्पना खरात हिच्यासह सर्व आरोपींना समन्स बजावले होते. त्यानुसार कल्पना खरात विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्यासमोर 22 सप्टेंबरला हजर झाली. यावेळी कल्पना खरातकडून जामीनासाठी अर्ज करण्यात आला. यावर कल्पना खरात हिला न्यायालयाकडून 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि परदेशबंदीच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Bhondubaba Ashok Kharat Nashik News)

अशोक खरातविरुद्ध एकूण 17 गुन्हे दाखल- (Ashok Kharat Nashik News)

अशोक खरात विरोधात ईडीने दाखल केलेल्या 3 हजार पानी दोषारोपपत्रातील प्रकरणात सुनावणी पार पडली. अशोक खरातला नाशिकरोड कारागृहातून व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. अशोक खरातविरुद्ध नाशिकसह सिन्नर, शिर्डी आणि राहता येथे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. ईडीने दाखल केलेल्या या खटल्यात न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडी वाढवली आहे. आता 30 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. अशोक खरातवर दैवी शक्ती आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणुकीचा आरोप आहेत.

रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये अशोक खरातने पैसा गुंतवल्याचा गंभीर आरोप- (Ashok Kharat Case)

लोकांना लुटून कमावलेली ही काळी कमाई पांढरी करण्यासाठी खरातने मोठा कट रचला होता. त्याने तब्बल 142 बेनामी खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. सहकारी पतसंस्था, बेनामी बँक खाती, त्याचे कुटुंबीय आणि निकटच्या साथीदारांच्या माध्यमातून त्याने या पैशांचे कथित मनी लॉन्ड्रिंग केले. हा सगळा पैसा त्याने महाराष्ट्रातील विविध भागांत रिअल इस्टेट आणि आलिशान मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे. ईडीच्या या 3000 पानांच्या आरोपपत्रामुळे आता या भोंदू बाबाचे संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश

Read Entire Article