Asim Sarode Shivsena Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?; ठाकरेंचे वकील असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!

1 month ago 6
ARTICLE AD

Asim Sarode Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज (2 सप्टेंबर) दुपारी 2 नंतर पुन्हा सुनावणी (Shivsena Name And Symbol Hearing) होणार आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांच्या जोरदार युक्तिवादानंतर आजपासून शिंदे गटाकडून युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली. आजपासून शिवसेनेकडून मुकुल रोहतगी, निरज किशन कौल हे युक्तीवाद करतील.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी 5 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झाली. गेल्या महिन्याभरापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी सुरु आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजीपासून ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर 2 सप्टेंबरपासून शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. याचदरम्यान, ठाकरेंची बाजू मांडणारे वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी आजच्या सुनावणीआधी एक्सवर पोस्ट करत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सुनावणीवर महत्वाचं भाष्य केलं आहे. तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार, निकाल कधी लागणार?, यावर देखील असीम सरोदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

असीम सरोदे काय म्हणाले? (Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing)

शिवसेना सत्तासंघर्ष सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे व फुटीर आमदारांच्या तर्फे अनेक जेष्ठ वकील युक्तिवाद करणार आहेत. जेष्ठ वकील नीरज किशन कौल हे मुख्यतः बाजू मांडतील व सोबतच जेष्ठ वकील मुकुल रोहतगी, जेष्ठ वकील मनिंदर सिंग, जेष्ठ वकील महेश जेठमलानी तसेच जेष्ठ वकील हरीश साळवे हे सुद्धा कदाचित युक्तिवाद करण्यासाठी अवतीर्ण होतील असे वाटते. आणि संविधानिक पदांवरील व्यक्ती तसेच निवडणूक आयोग यांच्यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आजपर्यंतच्या विविध वेळी युक्तिवाद केला आहे त्यामुळे ते सुद्धा असतील. न्यायालयाचे नियमित कामकाज संपवून दुपारी साधरणतः 3 वाजता या प्रकरणाचे कामकाज सुरु झाले तरीही दरवेळी 45 मिनिटे ते 1 तास या कालावधीसाठी युक्तिवाद होतो. प्रत्येक वकिलाला 2 तास असे गृहीत धरले तरीही अजून 10-12 तासांचे युक्तिवाद जास्तीजास्त होतील. म्हणजे आणखी 2 आठवडे जातील. कोर्ट जो निर्णय घेईल त्याला काही आठवड्यांचा अवधी लागेल असे गृहीत धरले तर निकालासाठी पुढील महिना उजाडेल. म्हणजे सप्टेंबरच्या शेवटी व ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत.

शिवसेना सत्तासंघर्ष सुनावणी मध्ये एकनाथ शिंदे व फुटीर आमदारांच्या तर्फे अनेक जेष्ठ वकील युक्तिवाद करणार आहेत. जेष्ठ वकील नीरज किशन कौल हे मुख्यतः बाजू मांडतील व सोबतच जेष्ठ वकील मुकुल रोहतगी, जेष्ठ वकील मनिंदर सिंग, जेष्ठ वकील महेश जेठमलानी तसेच जेष्ठ वकील हरीश साळवे हे सुद्धा…
— Asim Sarode (@AsimSarode) September 2, 2026

आजपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून युक्तीवाद- (Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court)

महाराष्ट्रातील सद्यस्थितीची तुलना करत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर महत्त्वाची मागणी मांडली आहे. कथित बंडखोरी आणि पक्षांतराच्या आधारे मिळालेलं धनुष्यबाण पक्षचिन्ह हे केवळ तथाकथित विधिमंडळ बहुमतावर आधारित असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. संबंधित आमदारांनी पक्षांतर केलं होतं की नाही, याचा अंतिम फैसला सर्वोच्च न्यायालयानेच करावा, अशी मागणी कामत यांनी केली. न्यायालयानं पक्षांतर झाल्याचं ठरवल्यास, केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देताना मानलेला मूळ आधारच संपुष्टात येईल, असाही दावा त्यांनी केला.या महत्त्वाच्या आणि आक्रमक मुद्द्यांसह ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या कायदेशीर मुद्द्यावरील युक्तिवाद पूर्ण केला. आता शिंदेंच्या शिवसेनेकडून या प्रकरणावर 2 सप्टेंबरला युक्तीवाद होणार आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सुनावणी, आतापर्यंत कोर्टात काय घडलं?, VIDEO:

संबंधित बातमी:

Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; काल एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीत पोहोचले आणि म्हणाले...

Read Entire Article