Babanrao Taywade on Manoj Jarange Patil Protest: ना नवीन GR, ना लेखी आश्वासन, जरांगेंच्या उपोषण स्थगितीनंतर बबनराव तायवाडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारची भूमिका पाहता...

1 month ago 6
ARTICLE AD

Babanrao Taywade on Manoj Jarange Patil Protest: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये (Government Delegation) झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपले उपोषण (Hunger Strike) स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारच्या शिष्टमंडळाची झालेली चर्चा आणि ज्या मुद्द्यांवर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले, त्याचा अभ्यास केल्यावर ओबीसी आरक्षणाच्या हितांना कुठेही बाधा पोहोचलेली नाही, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे. आमचे आधीपासूनच मनोज जरांगे पाटील ऐवजी सरकारच्या भूमिकेवर लक्ष होते आणि सरकारची भूमिका पाहता ओबीसींचे आरक्षण अबाधित असल्याचे तायवाडे म्हणाले. मनोज जरांगे पाटील जरी 58 लाख नोंदींपैकी एकही नोंद कमी होता कामा नये, असे म्हणत असले, तरी त्या नोंदी जरांगेंच्या आंदोलनाच्या बऱ्याच पूर्वीच्या आहेत आणि त्यापैकी 37 लाख लोकांना आधीच जात प्रमाणपत्र (Caste Certificate), जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) मिळाले असून ते अनेक वर्षांपासून आरक्षणाचा लाभही घेत आहेत. त्यामुळे त्या नोंदींपैकी एकही नोंद कमी होण्याचे कुठलेही कारण नाही, असा दावाही तायवाडे यांनी केला.

Babanrao Taywade on Manoj Jarange Patil Protest: ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही

यंदा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा शेवट सरकारकडून कुठलाही नवीन जीआर न काढता किंवा लेखी आश्वासन न देता झाला, याकडेही त्यांनी सूचक लक्ष वेधले. हैदराबाद गॅझेटिअरचा मुद्दा पूर्णपणे सुटलेला नसताना सातारा, कोल्हापूर आणि औंध गॅझेटिअरची मागणी समोर आली आहे. मात्र, त्यानेही ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही, असा विश्वास तायवाडे यांनी व्यक्त केला आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंकडून 90 दिवसांची मुदत

दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी 17 सप्टेंबर रोजी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी 90 दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. उपोषण स्थगित केले आहे, मात्र आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले. जीआर काढून गॅझेटिअरची अंमलबजावणी करावी, 58 लाख नोंदींमधील एकही नोंद कमी व्हायला नको आणि नोंदी कमी करणार नाही याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी जरांगेंनी केली आहे. जर सरकारने धोका दिला, तर आम्ही मुंबई गाठणार असा इशारा देत त्यांनी समर्थकांना माघारी फिरण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis And Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस माझे वैरी नाहीत, एकनाथ शिंदेंवर प्रेम करु, पण...; उपोषण स्थगित करण्याआधी मनोज जरांगेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?

Read Entire Article