Babanrao Taywade On Manoj Jarnge : मनोज जरांगेंची सर्वात मोठी ताकदच त्यांच्या मुंबईच्या आंदोलनातील अडथळा ठरणार? बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण

1 month ago 4
ARTICLE AD

Babanrao Taywade : मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदान मराठा नेते जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी तिसऱ्यांदा मागितलेल्या परवानगीवर अद्याप निर्णय झालेला नाही अशी माहिती समोर आली आहे. आंदोलनाचा परवानगी मिळावी यासाठी जरांगे पाटील हे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची देखील माहिती आहे. या पूर्वी जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याकडून दोन वेळा परवानगी मागण्यात आली होती. मात्र मागच्या आंदोलनाचे दाखले देत दोन्ही वेळा पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यास त्या सुनावणीकडे सरकार आणि पोलिसांचे लक्ष लागून राहिले आहे,तर याबाबत आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष,डॉ. बबनराव तायवाडे, यांनी भाष्य केलं आहे.(Babanrao Taywade)

मंत्री ही माणसं असतात, त्यांनाही भावना असतात, तीच दुखावलेली भावना...

मनोज जरांगे सोबतची सध्याची गर्दी त्यांचा नवा अर्ज फेटाळण्याचे कारण बनेल, मंत्री ही माणसं असतात, त्यांनाही भावना असतात, तीच दुखावलेली भावना कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिसून आली, असं डॉ. बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे. कोणत्याही आंदोलनाची यशस्विता आंदोलनाचा सूत्रधार, नेतृत्व करणारा त्याच्या समर्थकांना किती समजावू शकतो, समर्थक त्यांचे किती ऐकतात यावर अवलंबित असते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जरी त्यांच्या समर्थकांना माझ्यासोबत पुढे येऊ नका, मुंबईला येऊ नका असे म्हणत असले, तरी त्यांचे समर्थक त्यांचे किती ऐकतात यावर त्यांच्या आंदोलनाची यशस्विता अवलंबित असल्याचे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले आहे.

नव्या अर्जावर निर्णय घेताना पोलीस या गर्दीला आधार बनवू शकतात

प्रशासन आणि पोलीस सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. जरांगे पाटील यांच्यासोबत असलेली गर्दी सध्या पोलिसांना ही दिसत आहे. त्यामुळे मुंबईत आंदोलनाची परवानगी घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी केलेल्या नव्या अर्जावर निर्णय घेताना पोलीस या गर्दीला आधार बनवू शकतात असे सूचक वक्तव्य ही तायवाडे यांनी केले. दरम्यान मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री असले, तरी तेही माणूसच आहेत, त्यांनाही भावना आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना जेव्हा सर्व मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा मंत्रीही भावनिक होतात. प्रत्येक मंत्री कुठल्यातरी पक्षाचा संघटनाचा सदस्य असतो. जेव्हा संघटनेबद्दल पक्ष नेत्याबद्दल खालच्या पातळीवर टीका केली जाते. तेव्हा मंत्री असले तरी त्यांची भावना दुखावली जाते आणि तीच दुखावलेली भावना कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आली असे ही तायवाडे म्हणाले.

आंदोलनाची यशस्विता ही मुख्य सूत्रधाराच्या आवाहनाला समर्थक किती...

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीवरून निघाल्यानंतर बीडमधील पाटोदा येथे मुक्कामी असताना, त्यांनी आपल्या समर्थकांना मुंबईला जाताना मागे गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. तरीही त्यांच्यासोबत हजारो समर्थकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. यावर बोलताना डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केले की, आंदोलनाची यशस्विता ही मुख्य सूत्रधाराच्या आवाहनाला समर्थक किती मनावर घेतात आणि ऐकतात यावर अवलंबून असते. हा मराठवाड्यातील मराठा समाजाचा एक अत्यंत भावनिक प्रश्न बनल्यामुळे मराठा समाजातील प्रत्येक नागरिक भावनिक झाला आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी कितीही आवाहन केले, तरी लोकांच्या भावना आंदोलनाशी जोडलेल्या असल्याने समर्थक हे आवाहन कितपत पाळतील हा प्रश्नच आहे आणि म्हणूनच ही मोठी गर्दी दिसत आहे. पुढे जात असताना ही गर्दी त्यांच्या मागेच राहणार आहे. जरांगे पाटील जरी आपण एकटे जात असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्ष चित्रात कुठल्याही क्षणी ते एकटे दिसत नसून सोबत लाखो-हजारो समर्थक दिसत आहेत. जरांगे पाटलांनी परवानगी मागितली असली, तरी हे संपूर्ण चित्र आता सरकारसमोर उभे राहणार आहे. सरकार प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात आहे. तसेच, माध्यमांमधून जरांगे पाटलांची प्रकृती अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. आंदोलनकर्त्यांनी सर्वात आधी स्वतःच्या आरोग्याची आणि स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे असते, त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि या स्थितीचा पुनर्विचार करावा, असा सल्ला तायवाडे यांनी दिला.

. एकीकडे 'मी एकटा येणार' असे सांगायचे आणि दुसरीकडे समर्थकांनी ऐकले नाही म्हणून...

जर हीच गर्दी पुढे पुणे, रायगड, खोपोली आणि मुंबईच्या दिशेने गेली, तर पोलीस प्रशासन, समाज, नागरिक आणि सरकार या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या तिसऱ्या अर्जाची परवानगी नाकारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे 'मी एकटा येणार' असे सांगायचे आणि दुसरीकडे समर्थकांनी ऐकले नाही म्हणून पदोपदी गर्दी दिसणे, या गोष्टींचा प्रशासनाला विचार करावाच लागेल. अशा वेळी आंदोलनाच्या सूत्रधारांनाही समर्थकांच्या भूमिकेचा आणि आपण दिलेल्या आश्वासनांचा गंभीरपणे पुनर्विचार करावा लागतो. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ ओबीसी समाजाचेच नव्हे, तर सर्वपक्षीय आणि सर्व जाती-धर्मांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर भाष्य करताना तायवाडे म्हणाले की, मागील तीन वर्षांच्या प्रवासात आणि विशेषतः गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत जे बसते तेच सरकार देऊ शकते; त्याव्यतिरिक्त देता येत नाही. तसेच, मागितलेल्या १५ मागण्यांपैकी १२ ते १३ मागण्या पूर्ण झाल्या असून उरलेल्या मागण्या न्यायप्रविष्ट असल्याने विधीतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय मान्य करता येत नाहीत.

एवढे स्पष्ट असतानाही दररोज कोणाला ना कोणाला दोषी ठरवले जात आहे. मंत्रिमंडळातील सदस्य हे शेवटी माणसे असून त्यांच्याही भावना असतात. ते ज्या पक्ष आणि संघटनेत काम करतात, तिच्या नेत्याविषयी अशी भाषा वापरली गेल्यास भावना दुखावणे स्वाभाविक आहे. चांगुलपणाची एक मर्यादा असते आणि ती ओलांडली की लोक भावनिक होतात. मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर मंत्री हे विशिष्ट जाती-धर्माचे नसून संपूर्ण महाराष्ट्राचे असतात आणि सर्वांचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य असते. त्यामुळेच सुसंस्कृत महाराष्ट्राला ही भाषा शोभणारी नाही, अशा भावना काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत, असंही पुढे तायवडेंनी म्हटलं आहे.

Read Entire Article