Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील चौघांचा तर, उईके कुटुंबातील आईसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत, पाच चिमुकले आईच्या प्रेमाला मुकले

1 month ago 5
ARTICLE AD

Bhandara Accident News: भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव इथं काल (11 सप्टेंबर ) पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident News) घटनास्थळी 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर, 13 जण जखमी झाले आहेत. या सर्व अपघातग्रस्तांची ओळख पटली आहे. या भीषण अपघातात वर्मा कुटुंबातील आई, चिमुकली, आजी आणि अन्य एक महिला नातेवाईक अशा चौघांचा मृत्यू झाला. तर, उईके कुटुंबातील आईसह तिच्या दोन बाळांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. यासोबत अन्य तीन महिलांचा या भीषण अपघातात मृत्यू झाल्यानं त्यांचे पाच मुलं आईच्या प्रेमाला मुकले आहेत. हे सर्व अपघातग्रस्त छत्तीसगडमधून बोलेरो वाहनानं नागपूरला जात असताना हा भीषण अपघात घडला. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. तर, 13 जणांपैकी काहींवर भंडारा, नागपूर इथं उपचार करण्यात येत आहे. तर, किरकोळ जखमींना सुट्टी देण्यात आली आहे. (Bhandara Accident News)

Bhandara Accident News: नेमकं काय घडलं

भंडाराच्या लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव आणि मुंडीपार गावादरम्यान काल (11 सप्टेंबर) पहाटे झालेल्या भीषण अपघातात घटनास्थळी 8 जणांचा तर उपचारासाठी नेत असताना एका अशा 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर, 13 जण जखमी झाले असून यातील काही गंभीर जखमी आहेत. या सर्व अपघातग्रस्तांची ओळख लाखनी पोलिसांनी पटविली आहे. या घटनेतील मृतक आणि जखमी हे सर्व छत्तीसगड राज्यातील असल्यानं त्यांची ओळख पटवितांना लाखनी पोलिसांना ही मोठी कसरत करावी लागली. नागपूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या बोलेरो वाहनामध्ये चालक, महिलांसह 10 बालक असे एकूण 22 जण प्रवास करीत होते. पिंपळगाव येथील पेट्रोल पंप वरून बाहेर निघालेले आयशर ट्रकवर भरधाव बोलेरो धडकल्यानं या भीषण अपघातात 6 महिला आणि 3 बालकांचा मृत्यू झाला. तर, 13 जणांवर भंडारा, नागपूर इथं उपचार करण्यात येत असून या अपघातात किरकोड जखमी झालेल्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Bhandara Accident News: आयशर ट्रक चालक, बोलेरो पिकप चालकसह पेट्रोलपंप मालकावर गुन्हा दाखल

या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर ट्रक चालक अमरसिंग यादव, बोलेरो पिकप वाहन चालक जगु उर्फ जगदेव वर्मा या दोन चालकांवर मृत आणि जखमींना कुठलीही वैद्यकीय मदत न पुरविता घटनास्थळावरून पसार झाल्या प्रकरणी तर, ज्या पेट्रोल पंपवरून आयशर राष्ट्रीय महामार्गावर निघाला या द्वारका पेट्रोलपंप मालकावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनेच्या अटी आणि शर्ती न पाळल्या प्रकरणी अशा तिघांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासह विविध कलमांतर्गत लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhandara Accident News:  मृतांमध्ये यांचा आहे समावेश

१) जामबाई वर्मा (५०) नागपूर,

२) मीनाक्षी वर्मा (२६),

३) ग्रीशा वर्मा (०२)

४) गायत्री उईके (३०)

५) स्वीटी उईके (०६)

६) धैर्य उईके (०४)

७) सरिता वर्मा (३०)

८) राजकुमारी पटले (३५)

९) गणेशया पटले (२२)

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनासाठी हायकोर्टाची प्रमुख अट, राज्य सरकारलाही महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?

Read Entire Article