Bhandara Accident News: मध्यप्रदेशातील बालाघाटचे भाजप खासदार भारती पारधी (BJP MP Bharti Pardhi) यांच्या वाहनानं तुमसर-रामटेक या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार दोघांना चिरडल्याची (Car Accident) घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. परिणामी त्यांना तातडीनं भंडारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा असं या अपघातात गंभीर जखमींचं नावं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही जखमी हे पंजाब मधील असून भंडारा जिल्ह्यात भात कापणीसाठी हार्वेस्टरवर मजूर म्हणून आलेले आहेत. बालाघाटच्या खासदार भारती पारधी या स्वतः या अपघातग्रस्त वाहनातून बालाघाट येथून नागपूरच्या दिशेनं प्रवास करीत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील उसर्रा इथं हा अपघात घडला आहे. (BJP MP Bharti Pardhi Car Accident)

दरम्यान, याप्रकरणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतल असून पुढील घटनेचा तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेनं काहीकाळ परिसरात वाहतूक अडथळा निर्माण झाला होता. व बघ्यांनी एकच गर्दी केल्याने परिसरातही खळबळ उडाली होती.

Crime: शासकीय धान्य गोडाऊनमधून 361 कट्टे तांदळाची चोरी; सडकअर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवासह 11 जणांना अटक

भंडाऱ्याच्या साकोली येथील शासकीय धान्य गोडाऊन मधून 361 कट्टे तांदळाचे चोरी झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा छडा लावला असून 11 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, या ११ जणांमध्ये धान्य गोडाऊनमध्ये हमालीचं काम करणारे मजूर आणि गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सहकार क्षेत्रात विविध महत्त्वाच्या पदावर असलेल्या राईस मिल संचालक संजय पुस्तोडे याचा समावेश आहे. साकोली शहरातील या शासकीय धान्य गोडाऊनमधून एका पिकअप वाहनाच्या माध्यमातून या धान्याची वेगवेगळ्या दिवशी चोरी केल्याचं प्रकरण आता पोलीस तपासात समोर आलं आहे.

चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर शासकीय धान्य गोडाऊनचे व्यवस्थापक दीपक चौधरी यांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून या रॅकेटचा छडा लावला. तपासा दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गिरोला हेटी येथील राईस मिल संचालक तथा सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पुस्तोडे याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत हा संपूर्ण प्रकार समोर आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी आता पिकअप वाहनासह चोरीला गेलेला 5 लाख 41 हजार 500 रुपयांचा तांदूळ जप्त केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Nagpur BJP: बंडोबांना थंड करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांचाही जोरदार प्रयत्न; नितीन गडकरींचा अनिल सोलेंना फोन, पण...; नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचं टेन्शन वाढलं