Bigg Boss fame Divya Shinde Arrest: 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?

1 month ago 3
ARTICLE AD

Bigg Boss Marthi fame Divya Shinde Arrested: पुण्यात 'बिग बॉस मराठी'ची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला (Divya Shinde)  पोलिसांनी अटक केली आहे. एका ज्येष्ठ सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत खंडणी मागितल्याचा आरोप तिच्यावर आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पैसे मागण्याच्या नावाखाली ज्येष्ठ निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशत माजवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात दिव्या शिंदेविरोधात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिला न्यायालयात हजर केलं आहे.

नेमकं घडलं काय?

पुण्यातील एका निवृत्त सरकारी डॉक्टरांच्या घरात घुसून इन्फ्लुएन्सर व 'बिग बॉस मराठी'ची माजी स्पर्धक दिव्या शिंदेने त्यांना बेल्ट आणि काठ्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. ही कथित घटना गुरुवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. विद्याधर गायकवाड हे सेवानिवृत्त सरकारी डॉक्टर असून 'करुणादीप फाउंडेशन' या संस्थेचे ते सदस्यही आहेत. या संस्थेच्या एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेले नसतानाही दिव्या शिंदे कार्यक्रमात गेली. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून उपस्थित त्यांना संबोधित केलं.या कार्यक्रमाला तिच्यामुळे प्रसिद्धी मिळाली असा दावा करत 5 लाख रुपयांची मागणी केली. डॉक्टर विद्याधर यांनी तिला 50 हजार रुपये ऑनलाईन पाठवल्यानंतर ती आणखी पैशाची मागणी करू लागली असा आरोप करण्यात आला.

गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिव्या शिंदे इतर काही जणांसोबत डॉक्टर गायकवाड यांच्या निवासस्थानी गेली. काठी, बेल्ट यांचा वापर करून डॉक्टरांना मारहाण केली.तिच्यासोबत असलेल्या काही लोकांनी त्यांच्या घराची तोडफोड केली.5 लाख रुपये न दिल्यास जीवे मारण्याचे धमकी दिली असे FIR मध्ये म्हटले आहे.  दरम्यान, याप्रकरणी आता दिव्या शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे.

‘बिग बॉस मराठी’मधून बाहेरचा रस्ता

दिव्या शिंदे सोशल मीडियावरील रील्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर तिला ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही सहभागी होण्याची संधी मिळाली होती. मात्र, शोमधील तिच्या वर्तनावरून वाद निर्माण झालेला. फेब्रुवारी 2026 मध्ये सहस्पर्धकांना धमकावल्याच्या आरोपांनंतर दिव्याला ‘बिग बॉस मराठी’मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता पुण्यातील या कथित खंडणी आणि मारहाणीच्या प्रकरणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलिसांकडून सुरू आहे.

Read Entire Article