BLOG : महायुतीच्या पोखरलेल्या भिंती पराभवाचं कारण

15 hours ago 3
ARTICLE AD

BLOG : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका पार पडल्या. यात महाविकास आघाडीला तीन ठिकाणी तर महायुतीला दोन जागांवर विजय संपादन करता आला. म्हणजे एकप्रकारे महायुतीचा हा पराभवच म्हणावा लागेल. यात दोन्ही शिक्षक मतदारसंघ महायुतीला जिंकता आले. पण पदवीधरमध्ये महायुतीची विशेषतः भाजपची मोठी पिछेहाट झाली.

भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय

भाजपनं पाच पैकी तीन जागा लढवल्या त्यापैकी फक्त एक जागा त्यांना जिंकता आली. पण तीन पदवीधर जागांपैकी एकही जागा जिंकता न येणं हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. कारण या निवडणुकांमध्ये दरवेळी नव्यानं मतदार नोंदणी केली जाते. यात नव्या पदवीधरांची म्हणजे तरुण वर्गाची भर असणारच आहे. मग हा वर्ग भाजपपासून दूर जातोय का? याचा विचार भाजपला करणं गरजेचं आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा विरोधकांकडून जे मुद्दे उपस्थित केले जातायत ते एसआयआर, पेपरफुटीसारखे सगळे मुद्दे फेक नरेटिव्ह म्हणून भाजप दुर्लक्षित करत असलं तरी मुद्दे मतदारांना विशेतः तरुणांना अपील होतायत का? याचा विचार भाजपला नक्की करावा लागेल. विरोधकांचे हे मुद्दे फोडून काढण्यासाठी भाजपची पुढची रणनीती काय असेल?  २०२४ ला महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणलेली लाडकी बहीण योजना महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक ठरली होती. २०२९ साठी भाजपकडे कुठला असा मास्टर प्लान आहे का?

महायुती धर्म

भाजपनं पाच पैकी तीन जागा लढवल्या होत्या, तर दोन जागा आपल्या मित्र पक्षांना दिल्या होत्या. मात्र दरवेळी भाजप सांगेल ती पूर्व दिशा म्हणणाऱ्या मित्र पक्षांच्या नाराजीचा फटका भाजपला नक्कीच बसला. पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेच्या मंगेश चिवटेंनी आपला अर्ज दाखल करत पक्की दावेदारी सांगितली होती. तसंच राष्ट्रवादीच्या भैया मानेंनीही आपला अर्ज दाखल केला होता. मात्र सरतेशेवटी या बंडखोरांची समजून सांगण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं खरं पण बंडखोरांनी मनाने किती प्रमाणात महायुतीच्या उमेदवाराचं काम केलं? हा भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय.

त्याचसोबत निष्ठावंतांना डावलून आयारामांना संधी देणं, ही भाजपची सवय येत्या काळात भाजपला महागात पडू शकते. एकेकाळी पदवीधरचे सातही मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले होते. पण आता केवळ एकेठिकाणी भाजपचा आमदार आहे. यामागचं कारण म्हणजे, भाजपला अपेक्षित असलेली नोंदणी न होणं.

यासोबत महायुतीला पुढे जड जाणारी बाब म्हणजे समन्वयाचा अभाव. जी चूक विधानसभेला महाविकास आघाडीनं केली तीच चूक आता महायुती करतेय. भाजपनं डोळे मोठे केले की ऐकणारे मित्र पक्ष आता स्वतःची भूमिका मांडू लागले आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे जरी जिंकले असले, तरी त्यांच्या विरोधी उमेदवार खुद्द एकनाथ शिंदेंनी दिलेला पाठिंबा हा भाजपला बसलेला मोठा धक्काच मानवा लागेल. त्यासोबतच औरंगाबाद मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाणांविरोधात अब्दुल सत्तारांनी केलेलं काम महायुतीच्या भिंती पोखरत चालल्या आहेत का? असा प्रश्न निर्माण करतात.

भाजप समोरचं मोठं आव्हान

ऐकेकाळी भाजपचं आयटीसेल निवडणुका जिंकवून देणारं ब्रह्मास्त्र आहे, असं बोललं जायचं. पण सोशल मीडियावर भाजपविरोधात सीजेपीनं तयार केलेली लाट, बाहेर आलेल्या ऑडिओ क्लिप, आयटी सेलच्या कामावर प्रश्न निर्माण करतात. या निवडणुकीतही सोशल मीडियातूनवर आलेल्या नितेश कराले मास्तरांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात २४ हजार मतं घेतली. तर रविराज साबळेंनी औरंगाबाद पदवीधरमध्ये २० हजारांहून अधिक मतं घेतली. या दोघांच्याही मागे ना कार्यकर्त्यांची फौज होती, ना कुठलं कॅडर. त्यामुळे या दोघांनी घेतलेली मतं सोशल मीडियाची ताकद दाखवून देतात. त्यामुळे भाजपला २०२९ सालची निवडणूक अवघड जाणार आहे हे निश्चित.

Read Entire Article