BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद

2 months ago 10
ARTICLE AD

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या 50 फेलोशिपच्या (BMC Gen Z Fellowship Programme 2026) जागांसाठी तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 19 ऑगस्टपासून सुरू झालेल्या अर्ज प्रक्रियेत आतापर्यंत 4 हजार 510 उमेदवारांनी नोंदणी केली असून, अडीच हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन माहिती सादर केली आहे. त्यापैकी 530 उमेदवारांनी शुल्क भरले आहे. या फेलोशिपसाठी दरमहा 61 हजार 500 रुपये मानधन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे बीकॉम, बीई-बीटेक, बीएससीसोबतच एलएलबी, एलएलएम, एमबीबीएस, एमए, एमएससी, एमकॉम आणि एमटेक अशा उच्चशिक्षित तरुणांनीही अर्ज केला आहे. (MUMBAI BMC Gen Z Fellowship Programme 2026)

BMC Fellowship Programme 2026: शुल्क भरणाऱ्या उमेदवारांमध्ये बीकॉमचे सर्वाधिक 107 उमेदवार

शुल्क भरणाऱ्या उमेदवारांमध्ये बीकॉमचे सर्वाधिक 107, बीई-बीटेकचे 81 आणि बीएससीचे 54 उमेदवार आहेत. एलएलबीचे पाच, बीए इकॉनॉमिक्सचे सहा, तर एलएलएम आणि एमबीबीएसच्या प्रत्येकी एका उमेदवाराने शुल्क भरले आहे. 21 ते 26 वयोगटातील पदवीधरांना या फेलोशिपसाठी संधी असून, एक वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत असून, इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

BMC Fellowship Programme 2026: नेमकं काय आहे मुंबई महापालिकेचा फेलोशिप कार्यक्रम?

मुंबईच्या महापालिकेने फेलोशिप कार्यक्रम 2026 जाहीर केला असून या फेलोशिप कार्यक्रमात तरुणांने थेट प्रशासकीय यंत्रणा आणि धोरणनिर्मितीमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे. 12 महिन्यांचा या उपक्रमात मुंबई महापालिकेत 50 फेलो उमेदवारांची नियुक्त होणार आहे. याचाच अर्थ 50 तरुणांना महापालिकेत थेट काम करण्याची संधी मिळणार आहे. या कामाच्या बदल्यात प्रत्येक फेलोला महिन्याला 61 हजार 500 रुपये एवढे मानधन मिळणार आहे. तर एक वर्षासाठी हा कंत्राटी पद्धतीने उपक्रम राबविण्यात येणार आहे. याद्वारे तरुणांना महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्षांसह अन्य खातेप्रमुखांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे प्रशासन आणि विकासकामांमध्ये तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.

Mumbai Crime : विलेपार्ले पूर्वेत तरुणीचा विनयभंग; शिक्षकाला अटक

विलेपार्ले पूर्वतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 47 वर्षीय शिक्षकाला अटकी करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक गणेश देवळूखकर याने पीडितेला व्हॉट्सॲपवर मेसेज करून भेटण्यासाठी बोलावले. भेटीदरम्यान आरोपीने तिचा हात पकडून पाठीमागून ओढले. त्यानंतर जबरदस्तीने मिठी मारून मुलीला चुकीचा स्पर्श करत लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात BNS कलम 75(3) अन्वये नोटीस देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. तर आरोपी आणि पीडिता एकमेकांच्या परिचयाचे असल्याची माहिती असून या घटनेने मात्र परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

Read Entire Article