Buldhana Farmer : 'वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली पण कर्ज फिटलं नाही'; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याने जीवन संपवलं; मंत्री बावनकुळे पोहोचण्यापूर्वीच दुर्घटना

4 weeks ago 2
ARTICLE AD

बुलढाणा : राज्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस अधिकच गडद होत असून, कर्जाच्या आणि नापिकीच्या विळख्यात सापडलेला बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर या गावातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाचा डोंगर आणि सावकारी तगाद्याला कंटाळून राहत्या घरात गळ्याला दोर लावून आपले जीवन संपवले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गावात पोहोचण्याआधीच ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Farmer Heart Wrenching Suicide Note : 'बायकोची पोत गहाण ठेवूनही कर्ज संपलं नाही...'

जीवन संपवण्यापूर्वी शेतकरी शंकर रामभाऊ भारसाकळे यांनी एक अत्यंत भावूक आणि वेदनादायी चिठ्ठी (Suicide Note) लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीतील शब्द दुष्काळाची आणि शेतकरी संकटाची भीषण वास्तवता मांडणारे आहेत.

"माझ्यावर खूप कर्ज आहे, वावर विकून पण कर्ज फिटलं नाही, एक वावर गहाण ठेवून बी फिटलं नाही, बायकोची पोत गहाण ठेवून पण पाहिजे तितके पैसे भेटले नाही म्हणून मी आता जीवन संपवत आहे."

Chandrashekhar Bawankule Buldhana Visit : मंत्री बांधावर पोहोचण्यापूर्वीच दुर्दैवी घटना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत होते. मात्र, मंत्री महोदय गावात पोहोचण्यापूर्वीच हताश झालेल्या शंकर भारसाकळे यांनी आपली जीवनयात्रा संपवली. प्रशासकीय मदत आणि मंत्र्यांचे दौरे प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याआधीच शेतकरी आपला जीव गमावत असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Buldhana Drought Situation : दुष्काळाच्या दाहकतेने संपूर्ण परिसर सुन्न

गेल्या काही काळापासून पडलेला दुष्काळ, पिकांचे झालेले नुकसान आणि डोक्यावर वाढत गेलेला कर्जाचा भार यामुळे शंकर भारसाकळे अत्यंत मानसिक तणावात होते. त्यांनी जमिनीचा तुकडा विकला, उरलेली जमीन आणि पत्नीचे मंगळसूत्र (पोत) गहाण ठेवले. मात्र तरीही कर्जाचा डोंगर उपसता आला नाही.

या दुर्दैवी घटनेनंतर चोंडी टाकळेश्वर गावावर शोककळा पसरली असून, सरकारी मदत केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, अशी तीव्र भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

Read Entire Article