Chandrakant Raghuvanshi Nandurbar News: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार 2 मंत्र्यांसमोरच रडले; निधी वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर

1 month ago 9
ARTICLE AD

Chandrakant Raghuwanshi Nandurbar News: नंदूरबार जिल्ह्यात शिवसेनेला (Nandurbar Shivsena Politics) निधी वाटपाच्या असमान सूत्रावरून शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेतील आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) भावूक झाले. अखेर दोन मंत्र्यांसमोरच चंद्रकांत रघुवंशी यांना रडू कोसळलं. कार्यकर्त्यांची कामं करायची कशी?, असा सवाल चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला. यावेळी मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासमोर चंद्रकांत रघुवंशींच्या अश्रूंचा बांध फुटला.

नेमकं काय घडलं? (Chandrakant Raghuwanshi Nandurbar News)

नंदूरबार जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला असून, याच असमान निधी वाटपावरून शिवसेनेचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) हे थेट दोन शिवसेना मंत्र्यांसमोरच भावूक झाल्याचे चित्र समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीमधील धुसफूस आता थेट चव्हाट्यावर आली असून, याच धुसफुसीतून जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपाच्या ठरलेल्या सूत्रावरून विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करताना आज शिवसेनेच्या मेळाव्यात दोन मंत्र्यांसमोरच त्यांना रडू कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.

निधी वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर; मंत्र्यांसमोर रघुवंशींच्या अश्रूंचा बांध फुटला- (Chandrakant Raghuwanshi Nandurbar News)

नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेचे सध्या विधानसभेचे आमदार आमश्या पाडवी आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी असे दोन आमदार आहेत. अशातच नियोजन समितीच्या ठरलेल्या निधी वाटपाच्या सूत्रानुसार या दोन्ही आमदारांच्या वाट्याला अत्यल्प निधी येत असल्याचे रघुवंशी यांनी सांगितले. यातून कार्यकर्त्यांची कामे करायची कशी, असा सवाल करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी भावनिक झाले. याच मुद्द्यावरून मंत्र्यांसमोरच त्यांना रडू कोसळले. त्यामुळे याबाबत थेट वरिष्ठ पातळीवर पक्षनिहाय निधी देण्याची विनंती त्यांनी मंत्री उदय सामंत आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.

नंदुरबारच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा- उदय सामंत (Uday Samant In Nandurbar)

नंदुरबार जिल्हा गुंतवणूक परिषदेत उद्योजकांशी मंत्री उदय सामंत यांनी संवाद साधला. जिल्ह्यातील औद्योगिक संधी, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या विविध शक्यतांवर यावेळी सविस्तर चर्चा केली. या परिषदेत 123 सामंजस्य करार (MoU) झाले असून, त्यातून 5004 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे. या गुंतवणुकीतून 7778 रोजगाराच्या संधी निर्माण होणे अपेक्षित आहे. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रात 4787 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Read Entire Article