Chhagan Bhujbal on Maratha Reservation: 'महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार', छगन भुजबळांचा घरचा आहेर; थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा

1 month ago 8
ARTICLE AD

Chhagan Bhujbal on Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस असून, त्यांनी सरकारला 11 तारखेपर्यंत सर्व मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली; मात्र अडीच तासांच्या चर्चेनंतरही तोडगा निघाला नाही. या सर्व घडामोडींवर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक भूमिका घेत महायुती (Mahayuti) सरकारला घरचा आहेर दिला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, जात पडताळणी समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्याच्यावर कुणीही दबाव आणता कामा नये. काही प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने नाकारली आहेत. ती दुरुस्त करून देतो, असं काही आमदार म्हणाले आहेत. आता माझा त्या आमदारांना सवाल आहे की, मुंबईत 4 नगरसेवकांचं जात पडळणीत प्रमाणपत्र रद्द ठरलं आहे. त्यामुळे त्यांचं नगरसेवक पद गेलं आहे. आता ते देखील तुम्ही दुरुस्त करून देणार आहात का? असे म्हणत त्यांनी प्रसाद लाड यांना टोला लगावला.

Chhagan Bhujbal:  तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार

मराठा समाजाकडून कुणबी प्रमाणपत्र घेताना दाखल्यावर खडाखोडी करण्यात आल्या आहे. आता ते दाखले तुम्ही स्वीकारणार आहात का? जात पडताळणी समितीवर कुणीही दबाव आणू नये. राज्यातील महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे ओबीसींनी तुम्हाला मदत केली आहे. तुमचं सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

Chhagan Bhujbal: आमचे एक नेते गेलेच होते लाड पुरवायला

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, आता मराठा कुणबी मंत्रालय करायचं सुरू आहे? आता हे कसं काय होईल? करायचं असेल तर प्रत्येक जातीसाठी करा. आमचा दाखल्याला विरोध नाही. मात्र, ओबीसी आरक्षण संपता कामा नये. सरकारने स्पष्टता आणायला हवी. कधी ओबीसी आरक्षण घेत आहे. कधी एसईबीसी आरक्षण घेत आहेत, तर कधी EWS आरक्षण घेत आहेत. आमचे सतत मंत्री जातात लाड पुरवायला. आमचे एक नेते गेलेच होते लाड पुरवायला. एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांबाबत बोलला तर ताबडतोब पोलीस जाऊन पकडतात आणि इथे तर सतत खालची भाषा बोलली जात आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Chhagan Bhujbal: ...तर मी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळला 750 कोटी आणि ओबीसी समाजाच्या समितीला केवळ 5 कोटी हे कसं काय चालेल? मी त्यामुळे त्या दिवशी समन्वय समितीच्या बैठकीतून उठून बाहेर आलो. हे अजिबात चालणार नाही. एकीकडे हॉस्टेल तयार झाले आहे. एसी हॉस्टेल आहेत आणि दुसरीकडे अद्याप काहीच नाही? हे अजिबात चालणार नाही. एकीकडे स्थानिक पातळीवर मराठा आरक्षण उपसमिती निर्णय घेत आहे. जीआर काढत आहे. त्यांना हा अधिकार कोणी दिला? आम्ही देखील इकडे विविध समितीत काम केलं आहे. आता ओबीसी समितीने असं केलं तर चालेल का? समितीचे प्रमुख विखे असं करणार असतील तर मी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?

Read Entire Article