Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!

2 weeks ago 3
ARTICLE AD

Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडकोतील वानखेडेनगरमध्ये 23 वर्षीय संजना नीलेश शेजवळ हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पतीकडून फसवणूक आणि सासरच्या छळाचा आरोप संजनाच्या माहेरच्यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे शासकीय नोकरीची थाप मारून लग्न केल्याचा आरोप पती निलेश शेजावळ यांच्यावर करण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.

नेमकं प्रकरण काय? (Chhatrapati Sambhajinagar News)

शासकीय नोकरीला असल्याची थाप मारून लग्न केले, मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पतीचा बनाव उघड झाला. त्यातच स्वयंपाक आणि कपड्यांवरून सासरच्या मंडळींकडून सतत हिणवले जात असल्याचा आरोप आहे. या सगळ्या मानसिक त्रासातून छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरात एका 23 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय- (Chhatrapati Sambhajinagar Crime News)

संजना नीलेश शेजवळ असे मृत विवाहितेचे नाव असून, लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांतच तिचा मृत्यू झाला. 13 ऑक्टोबर रोजी वानखेडेनगर येथील सासरी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. सासरच्या मंडळींनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संजनाच्या वडिलांना पतीने शासकीय नोकरीबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचा, तसेच सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचाही संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील आणखी एक घटना, 28 लाखांचे ऑटो पार्ट्स चोरीला-

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीतील ऑटो पार्ट्स निर्मिती करणाऱ्या कंपनीत तब्बल 28 लाख 13 हजार 527 रुपये किमतीचे ऑटो पार्ट्स चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील तयार पार्ट्सच्या साठ्यात गेल्या सहा महिन्यांपासून तफावत आढळून येत होती. अखेर प्रत्यक्ष पडताळणी केली असता हजारो पार्ट्स कमी असल्याचे समोर आले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने अंतर्गत चौकशी केली. या चौकशीत तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून पार्ट्सची चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या चोरीमागे नेमके कोण आहे आणि चोरी कशा प्रकारे करण्यात आली, याचा तपास आता पोलिसांकडून केला जाण्याची शक्यता आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Read Entire Article