Chhatrapati Sambhajinagar Crime: उद्योजकाच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲपच्या DP वर ठेवला, अकाउंटंटकडून अवघ्या दीड तासात 3 कोटी 70 लाख उकळले; छ. संभाजीनगरमध्ये चक्रावणारी घटना

1 month ago 7
ARTICLE AD

Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गारखेड्यातील एका मोठ्या इन्फ्रा कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲपच्या (WhatsApp) डीपीवर लावून सायबर ठगांनी (Cyber Criminals) कंपनीच्या अकाउंटंटला (Accountant) जाळ्यात ओढले. संचालकच मेसेज करत असल्याचा बनाव करून आरोपींनी अकाउंटंटकडून कंपनीच्या बँक खात्यांची माहिती आणि शिल्लक रकमेचे स्क्रीनशॉट मागवले.

त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अकाउंटंटने समोरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवला आणि आरोपींनी सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, अवघ्या दीड तासाच्या कालावधीत कंपनीच्या विविध बँक खात्यांमधून तब्बल 3 कोटी 70 लाख रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: मुलीचा फोटो DP वर ठेवून विश्वास संपादन

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कंपनीच्या संचालकांच्या मुलीचा फोटो व्हॉट्सॲपच्या डीपीवर लावला होता. त्यामुळे संबंधित व्यक्ती कंपनीच्या संचालकांच्या कुटुंबातीलच असल्याचा आभास निर्माण झाला. त्यानंतर व्हॉट्सॲप चॅटच्या  माध्यमातून अकाउंटंटशी संपर्क साधण्यात आला. आरोपींनी संचालकच संवाद साधत असल्याचे भासवले. त्यांनी अकाउंटंटकडून विविध बँक खात्यांमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, याचे स्क्रीनशॉट मागवले. अकाउंटंटनेही वरिष्ठांकडूनच सूचना आल्याचे समजून आवश्यक माहिती शेअर केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: दीड तासात कोट्यवधींचे ट्रान्सफर

यानंतर आरोपींनी अकाउंटंटला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम पाठवण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांवर विश्वास ठेवून अकाउंटंटने पैसे ट्रान्सफर केले. या संपूर्ण प्रकारात अवघ्या दीड तासात 3 कोटी 70 लाख रुपये दोन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आले. 14 ते 15 सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित अकाउंटंटने पोलिसांकडे धाव घेतली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: जवाहरनगर पोलिसांकडून तपास सुरू

याप्रकरणी 42 वर्षीय अकाउंटंटने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात (Jawaharnagar Police Station) सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांकडून पैसे ज्या दोन बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाले, त्यांची माहिती तपासली जात आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Mumbai Crime News: नाशिकमधील पोलीस अधिकारी असल्याचं सांगितलं, 14 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ केलं अन्...; मुंबईतील दोन ज्येष्ठ नागरिकांना 1.63 कोटींचा गंडा

Read Entire Article