Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिन्याच्या चिमुकल्याचा त्याच्याच जन्मदात्या आई-वडिलांनी (Parents) अवघ्या 1 लाख 20 हजार रुपयांत सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

बाळ विकून मिळालेल्या या पैशांतून हपापलेल्या आई-वडिलांनी दोन ब्रँडेड स्मार्टफोन (Branded Smartphones) आणि तब्बल 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) खरेदी केल्याची अत्यंत संतापजनक माहिती पोलीस तपासात (Police Investigation) समोर आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: 48 तासांत चार वेगवेगळ्या हातांतून बाळाची विक्री

मुकुंदवाडी पोलिसांनी (Mukundwadi Police Station) दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकल्याची खरेदी-विक्री अत्यंत वेगाने करण्यात आली. अवघ्या 48 तासांत चार वेगवेगळ्या मध्यस्थांच्या माध्यमातून या बाळाची पुढे-पुढे विक्री करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधून नांदेडमार्गे बाळाला थेट तेलंगणात (Telangana State) नेण्यात आले. तिथे या बाळाची किंमत तब्बल 2 लाख 70 हजार ते 3 लाख 50 हजार रुपयांपर्यंत वाढवून पुढे विक्री करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: हैदराबादमधून बाळाची सुखरूप सुटका; आंतरराज्यीय टोळी गजाआड

या घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने आंतरराज्यीय रॅकेटचा शिताफीने शोध सुरू केला. तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत पोलिसांनी थेट हैदराबाद गाठून अवघ्या एका महिन्याच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी जन्मदात्या आई-वडिलांसह आंतरराज्यीय टोळीतील सात आरोपींना बेड्या ठोकल्या (Arrested) आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime: बाल कल्याण समितीच्या आदेशानंतर अधिकृत संस्थेकडे सुपूर्द

सुटका करण्यात आल्यानंतर बाळाला बाल कल्याण समितीकडे नेण्यात आले. समितीच्या अधिकृत आदेशानुसार बाळाला सध्या शासकीय अधिकृत संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या आंतरराज्यीय बाळ विक्री रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, यादृष्टीने मुकुंदवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ketan Agrawal Case : सिया गोयलने कपटीपणाची हद्द गाठली, केतनला लोहगडावर नेण्यासाठी इन्टाग्रामवरुन ट्रॅप रचला, स्वत:च दुसऱ्या मुलीच्या नावाने....

Pune Crime News: लग्नासाठी 45 लाख खर्च, 10 तोळे सोनं दिलं; तरीही चारचाकीसाठी 5 लाख आणण्याचा तगादा, पुण्यात IT इंजिनिअर विवाहितेने जीवन संपवलं