Chhatrapati Sambhajinagar Crime: भावाची प्रगती डोळ्यात खुपली! वहिनी घरासमोर बेशुद्ध पडल्याचे भासवले; अखेर तपासात दीराचा क्रूर चेहरा आला समोर, छ. संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

1 month ago 3
ARTICLE AD

Chhatrapati Sambhajinagar Crime: घरच्याच माणसाने पाठीत खंजीर खुपसल्याची एक धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhajinagar) समोर आली आहे. चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याचा बनाव रचून नातेवाइकांनी अंत्यसंस्कारही उरकून घेतले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा भयानक उलगडा केला असून, लोखंडी रॉडने डोक्यात वार करून वहिनीला संपवल्याचे स्पष्ट झाले आहे. लता गंगाधर साळवे (वय 51) असे जीवन संपवलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव असून, या प्रकरणात त्यांचा सख्खा दीर सुभाष साळवे (वय 50) याला पोलिसांनी मुख्य आरोपी केले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: बनावट अपघाताचा असा रचला खेळ

16 सप्टेंबर रोजी लता साळवे या राहत्या घरासमोर अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना तत्काळ उपचारासाठी शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला चक्कर येऊन पडल्यामुळे आणि डोक्याला मार लागल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा समज पसरला. त्यानुसार नातेवाईकांनी तातडीने अंत्यसंस्कारही उरकून घेतले. मात्र, मयत लता साळवे यांच्या मुलाला सुरुवातीपासूनच या संपूर्ण घटनेवर आणि मृत्यूच्या कारणावर तीव्र संशय होता. त्याने पोलिसांकडे घातपाताची शंका व्यक्त केली होती.

Chhatrapati Sambhajinagar Crime: 'पीएम' रिपोर्टने उघड केले भयंकर सत्य

सिटी चौक पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक तपासावर भर दिला. निष्पन्न झालेल्या वैद्यकीय अहवालात लता साळवे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने अत्यंत प्राणघातक आणि तीव्र वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हा कोणताही नैसर्गिक मृत्यू किंवा अपघात नसून, त्यांची डोक्यात वार करून जीवनयात्रा संपवण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: प्रगतीचा मत्सर आणि संशयाचे भूत

पोलीस तपासात आरोपी दीर सुभाष साळवे याच्या भयंकर मानसिकतेचा पर्दाफाश झाला. सख्ख्या भावाच्या कुटुंबाची झालेली आर्थिक प्रगती, नवीन बांधलेले घर आणि दारात आलेल्या गाड्या पाहून आरोपी सुभाष साळवे याच्या मनात प्रचंड मत्सर निर्माण झाला होता. नातेवाईकांमुळेच आपली पत्नी आपल्याला सोडून गेली, असा गैरसमज आणि संशय आरोपीच्या मनात पक्का घर करून बसला होता. याच मत्सरातून आणि संशयाच्या भुतातून त्याने वहिनी लता साळवे यांचा काटा काढण्याचा कट रचला आणि संधी साधून लोखंडी रॉडने वार करत त्यांना कायमचे संपवले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल

मुलाने व्यक्त केलेला संशय आणि शवविच्छेदन अहवालातील ठोस पुराव्यांच्या आधारे, हा अपघाती मृत्यू नसून कट रचून घडवून आणलेले कृत्य असल्याचे सिद्ध झाले. याप्रकरणी 19 सप्टेंबर रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात आरोपी दीर सुभाष साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Case: आधी अपंग करण्याचा प्लॅन, नंतर 'माही’ नावाचं फेक अकाउंट, चॅट जीपीटी अन् तो सिनेमा...; केतन अग्रवाल प्रकरणात 5,053 पानांच्या चार्जशीटमधून चक्रावणारे खुलासे

Read Entire Article