Chhatrapati Sambhajinagar Crime: कायमस्वरूपी नोकरीचे (Permanent Job) आमिष दाखवून शिक्षक पती-पत्नीचे धर्मांतर (Conversion) केल्याचा आणि त्यानंतर तब्बल दोन वर्षे विनामोबदला काम (Unpaid Work) करून घेत पाच लाख रुपये उकळल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur) तालुक्यात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पीडित शिक्षकाच्या फिर्यादीवरून विरगाव पोलीस ठाण्यात (Virgaon Police Station) पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब आप्पासाहेब साठे आणि त्यांची पत्नी पूजा हे शांतीसदन प्राथमिक शाळेत (Shantisadan Primary School) 2024 पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपली नोकरी कायम होईल, या आशेने हे दाम्पत्य काम करत होते. मात्र, नोकरी कायम करण्यासाठी त्यांच्यासमोर धर्मांतराची अट ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: नोकरीसाठी धर्मांतराची अट?

फादर जेरल्ड यांनी शिक्षक दाम्पत्याला कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवत धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. या दबावाला बळी पडून बाळासाहेब साठे आणि त्यांच्या पत्नीने माळी घोगरगाव येथे धर्मांतर केले. धर्मांतर झाल्यानंतर आपली नोकरी कायम होईल, अशी अपेक्षा या दाम्पत्याला होती. मात्र, त्यानंतरही कायमस्वरूपी नियुक्ती न देता त्यांच्याकडून सुमारे दोन वर्षे विनामोबदला काम करून घेतले.

Chhatrapati Sambhajinagar Crime: नोकरी कायम करण्यासाठी 5 लाख रुपये

दरम्यान, नोकरी कायम करण्यासाठी शिक्षक दाम्पत्याकडून तब्बल पाच लाख रुपये उकळल्याची माहिती देखील समोर येत आहे. नोकरीची हमी, धर्मांतर आणि त्यानंतरही कायम नियुक्ती न मिळाल्याने बाळासाहेब साठे मानसिक तणावात होते.

Chhatrapati Sambhajinagar Crime: नैराश्यातून 15 दिवसांपूर्वी बेपत्ता

या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक त्रास वाढल्याने बाळासाहेब साठे नैराश्यात गेल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी ते अचानक बेपत्ता झाले होते. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती. नातेवाईक आणि पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागला आणि त्यांना सुखरूप घरी आणण्यात आले. यानंतर कुटुंबीयांनी संपूर्ण प्रकरणाबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. शिक्षकाच्या फिर्यादीवरून विरगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे वैजापूर तालुक्यात खळबळ उडाली असून, शिक्षक दाम्पत्याने केलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: आधी एकाच चितेवर तिघांना अग्नी, आता अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या लेकीनेही ICU मध्ये प्राण सोडला, नळदुर्ग प्रकरणात महत्त्वाची अपडेट