Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात काका-काकूंचे अश्लील व्हिडिओ (Video Viral) मोबाईलमध्ये तयार करून ते इतरांना प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गल्लेबोरगाव येथील 26 वर्षीय तरुणाने आपल्या 20 वर्षीय चुलत भावाविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर शेतातून जाऊ दिले नसल्याच्या कारणावरून आरोपीने राग मनात धरून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime News)

दरम्यान, आरोपीने काका-काकूंचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते इतरांना प्रसारित केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, आणखी व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत काकू आणि चुलत भावाला शिवीगाळ करून मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News : पोलिसांनी आरोपीची गावातून काढली धिंड

दरम्यान, पोलिसांनी आरोपीची गावातून धिंड काढल्याची माहितीही समोर आली आहे. ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर शेतातून जाऊ न दिल्याच्या कारणातून बदला घेतल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सध्या या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: बहिणीशी लग्न लावून देण्यास नकार; मेडिकल चालक भावाचा दुकानात घुसून बळी घेतला

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरात बहिणीशी लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या रागातून मेडिकल चालकाची दुकानात घुसून चाकू खुपसून हत्या करण्यात आली. फैसल कादर शेख असे मृत मेडिकल चालकाचे नाव आहे. हर्सूल येथील पटेल लॉन्सजवळील आयशा मंजिल परिसरातील लाइफलाइन मेडिकल शॉपमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी रेहान अमीन पटेल आणि समीर रईस शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रेहानचे काही महिन्यांपूर्वी फैसल यांच्या बहिणीसाठी लग्नाचे स्थळ आले होते. मात्र, कौटुंबिक कारणास्तव त्याला नकार देण्यात आला होता. याच रागातून रेहान हा फैसल आणि त्यांच्या कुटुंबावर राग धरून होता. तो वारंवार मेडिकल आणि घरासमोर बुलेटचा मोठा आवाज काढून त्रास देत असे. काल दुपारी रेहान आपल्या साथीदारांसह मेडिकलमध्ये घुसला. तेथे झालेल्या वादानंतर रेहानने फैसल यांच्या पोटात चाकू खुपसला. गंभीर जखमी फैसल यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर हर्सूल परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Kolhapur Madhuri Elephant : अखेर प्रतीक्षा संपली! माधुरी हत्ती नांदणीच्या मठात दाखल; हजारो कोल्हापूरकरांनी केलं जल्लोषात स्वागत