Chhatrapati Sambhajinagar Crime: संभाजीनगरात गुंडांची दहशत! थेट मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांची कार अडवली, चालकाला रक्तबंबाळ होईपर्यंत फोडून काढलं, तिघांना अटक

4 weeks ago 4
ARTICLE AD

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरात गुंडांनी हैदोस घातला आहे. पैठणहून न्यायालयीन काम आटोपून छत्रपती संभाजीनगर शहरात परतणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याचं शासकीय वाहन अडवत गुंडांनी चालकाला रक्तबंबळ होईपर्यंत मारहाण केली. गेल्या मंगळवारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी सलग तीन दिवस तपास केला. अखेर चालकाला मारहाण करणाऱ्या व कारची तोडफोड करणाऱ्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर शहरात मोठे खळबळ उडाली होती. आरोपींनी शासकीय वाहन अडवल्यानंतर चालकाला बेदम मारहाण केली होती, तर वाहनाचीही तोडफोड करण्यात आली.या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सलग तीन दिवस रात्रंदिवस तपास केल्यानंतर पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात यश आलं. अखेर तिघांनाही त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आलं.

नेमकं काय घडलं?

मुख्य न्यायदंडाधिकारी आर. एस. जांबोटकर हे पैठण येथील न्यायालयीन कामकाज आटोपून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचं शासकीय वाहन अडवलं. यानंतर वाहनाच्या चालकाला रक्तबंबळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. हल्ल्यात चालक जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं. यानंतर आरोपींनी वाहनाचीही तोडफोड केली. शासकीय अधिकाऱ्याच्या वाहनावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला.

सलग तीन दिवस पोलिसांचा तपास

घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू केला. सलग तीन दिवस रात्रंदिवस तपास करत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. अखेर तिघांनाही त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं.

गौरव ऊर्फ बंटी पैठणी, सुरेश गुटाळ आणि विनोद तायडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. गौरव पैठणी हा इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहे. सुरेश गुटाळ हा बनेवाडी येथील, तर विनोद तायडे हा कर्णपुरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी बांधकाम मजुरीचं काम करतात. या तिघांना अटक केल्यानंतर आता हल्ल्यामागचं नेमकं कारण काय होतं, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  दरम्यान, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनावर झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Read Entire Article