Chhatrapati Sambhajinagar: संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये; आईने काळजावर दगड ठेवून 5 दिवस 11 वर्षीय लेकाचा मृत्यू लपवला; काळीज पिळवटून टाकणारी घटना

1 month ago 4
ARTICLE AD

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अतिशय खळबळजनक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. नियतीने साधलेला हा क्रूर घाला ऐकूनही काळीज पिळवटून निघतंय. डेंग्यूच्या (Dengue) जीवघेण्या आजाराने एका सुखी-समाधानी कुटुंबाचे हसते-खेळते आयुष्य क्षणार्धात उद्ध्वस्त केलंय. 11 वर्षीय सोहम ससेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. मात्र, त्याचवेळी त्याचे आई-वडील आणि बहीणही गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे सोहमचे पार्थिव शीतगृहात ठेवण्यात आले होते. वडील आणि बहिणीला सोहमच्या मृत्यूची बातमी सांगितल्यास त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची भीती होती. त्यामुळे आईने काळजावर दगड ठेवत तब्बल पाच दिवस आपल्या पोटच्या लेकाचे पार्थिव शीतगृहात ठेवण्याची विनंती केली.  (Chhatrapati Sambhajinagar Dengue News)

Chhatrapati Sambhajinagar: हृदयपिळवटून टाकणारा प्रसंग; गावातील ग्रामस्थ आणि उपस्थितांचे डोळे अक्षरशः अश्रूंनी डबडबले

दरम्यान, पती आणि मुलगी धोक्याबाहेर आल्यानंतर अखेर सोहमच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली. ज्या बापाने आपल्या लेकाला खांद्यावर खेळवले, त्याच बापाच्या खांद्यावर 12 वर्षीय सोहमचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आले. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आई-वडील आणि बहीण घरी परतत असताना त्यांच्यासोबत सोहमचे पार्थिवही होते. हा हृदयपिळवटून टाकणारा प्रसंग पाहून करंजखेड गावातील ग्रामस्थ आणि उपस्थितांचे डोळे अक्षरशः अश्रूंनी डबडबले होते. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये शोककळा पसरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dengue News: डेंग्यूची काही प्रमुख लक्षणे

डेंग्यूला अनेकदा फसवा आजार म्हटले जाते. कारण त्याची सुरुवातीची लक्षणे इतर अनेक आजारांसारखी असू शकतात. त्यामुळे पहिल्या काही दिवसांत निदान करणे कठीण होते. डेंग्यूची काही प्रमुख लक्षणे म्हणजे अंगावर पुरळ येण्यासह ताप, डोळ्यांच्या हालचालीने वाढणारी डोळ्यांच्या मागे वेदना आणि 'हाडे मोडल्यासारखी वेदना' असे वर्णन केली जाणारी तीव्र अंगदुखी.

डेंग्यूचा आजार वेगाने वाढू शकतो आणि काही प्रकरणी रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते व तो जीवघेणा ठरू शकतो. ताप कमी होतो आणि पालकांना वाटते की त्यांच्या मुलाची प्रकृती सुधारत आहे, तेव्हाच डेंग्यूची गंभीर लक्षणे दिसायला सुरूवात होते. गंभीर डेंग्यूमध्ये रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि त्यातून गळती सुरू होते. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो आणि अवयव निकामी होण्याची शक्यता असते. धोक्याच्या लक्षणांमध्ये तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, शौचातून रक्त पडणे, नेहमीपेक्षा जास्त थकवा किंवा अस्वस्थतेची लक्षणे यांचा समावेश होतो.

इतर महत्वाच्या बातम्या

Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?

Read Entire Article