Climate Week India 2026: हवामान सुरक्षेसाठी अन् पर्यावरणासाठी मोठा उपक्रम; ‘क्लायमेट वीक इंडिया’मध्ये पुण्यात खास कार्यक्रमांचे आयोजन

1 month ago 2
ARTICLE AD

Climate Week India 2026: वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या आणि हवामान बदलाच्या (Climate Change) पार्श्वभूमीवर, हवामान सुरक्षेविषयी जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी 'क्लायमेट वीक इंडिया २०२६'चे आयोजन करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत संपूर्ण देशभरात हा सप्ताह साजरा होत असून, महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, सांगली यांसारख्या अनेक शहरांमध्ये विविध स्थानिक संस्था, बचत गट आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून मराठीसह विविध भाषांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.(Climate Week India 2026)

हा सप्ताह एका भव्य मंचापुरता मर्यादित नसून, तो पूर्णपणे 'विकेंद्रित' स्वरूपाचा आहे. यात नागरिक स्वतःहून एकत्र येऊन हवामान बदलावर चर्चा, चित्रपट प्रदर्शन, निसर्ग पदभ्रमण (Nature walks) आणि शाश्वत जीवनशैलीवर संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील काही ठळक कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत: (Climate Week India 2026)

पुण्यात चार दिवसांचा कार्यक्रम

पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टीकोन - (२९ सप्टेंबर) : पर्यावरणाच्या बदलांमागील कारणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून शोधत त्यावर काम करणे, याबद्दल डॉ. नितीन हांडे मार्गदर्शन करतील.
स्वच्छ (SWaCH) वेस्ट ट्रेल (३ ऑक्टोबर): मारुतीराव गायकवाड नगर, औंध येथे कचरावेचकांसोबत कचरा व्यवस्थापनाचे टप्पे आणि त्याचा शहरावर तसेच पर्यावरणावरील परिणाम समजून घेण्यासाठी विशेष 'मॉर्निंग वॉक'चे आयोजन करण्यात आले आहे.
नेचर वॉक व फिल्म स्क्रीनिंग (१ आणि २ ऑक्टोबर): निसर्गाच्या सानिध्यात पदभ्रमण आणि 'ALTEFF फिल्म क्लब'तर्फे पर्यावरणविषयक लघुपटांचे (Documentaries) स्क्रीनिंग.

नाशिकमध्ये ३ ऑक्टोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन

नाशिकमध्ये ३ ऑक्टोबर रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निसर्गकन्या आदिवासी महिला बचत गटाच्या कार्याची माहिती, आणि रानभाज्यांचे प्रदर्शन असणार आहे. 'चला जाणूया नंदिनी नदीला', हा विशेष कार्यक्रम असणार आहे. पावसाचं पाणी आपलं-आपणच साठवण्यासाठी, घरी रुफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग कसं करता येईल याची माहिती देणारं एक सत्र असेल. सोबतच वृक्ष-संधारणासाठीचा एक अनोखा 'कुसमाडी पॅटर्न' देखील याठिकाणी जाणून घेता येईल. हे सगळे कार्यक्रम मराठा विद्या प्रसारक समाजाचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च & टेक्नॉलॉजी (आयएमआरटी) याठिकाणी होणार आहे. दुपारी १२ वाजेपासून कार्यक्रमांना सुरुवात होईल.

याव्यतिरिक्त सांगलीमध्ये निनाद गोसावी यांच्या नेतृत्वामध्ये 'नेचर वॉक'चे आयोजन करण्यात आले आहे. ४ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत सांगलीतील शामरानगर या भागात ही प्रभातफेरी पार पडेल. धुळे-नंदुरबारमध्ये २ ते ४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये यंग फाउंडेशनमार्फत निसर्ग संवाद शिबीर घेतले जाणार आहे. सातपुड्याजवळील उड्या पाडा याठिकाणी हे शिबीर पार पडेल. विशेष म्हणजे हे शिबीर मराठी आणि स्थानिक पावरी भाषेतही होणार आहे.

क्लायमेट वीक इंडिया २०२६ हा समाजातील प्रत्येक घटकाचा कार्यक्रम आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची ही वेळ आहे. शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी आपापल्या शहरातील या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक आणि स्थानिक संस्थांकडून करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि कार्यक्रमांच्या नोंदणीसाठी (Registration) नागरिकांनी https://luma.com/ClimateWeekIndia2026?tag=maharashtra या संकेतस्थळांना भेट द्यावी.

Read Entire Article