Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती

1 month ago 8
ARTICLE AD

Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: आज 5 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026 ) उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत आहे. या महोत्सवात तब्बल 71 लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. गोविंदा पथकांचा मोठा सहभाग आणि ‘सेलिब्रिटी हंडी’ म्हणून मिळालेली ओळख यामुळे या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मुंबईतील दहीहंडी उत्सव – (Dahihandi In Mumbai 2026)

शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे दहीहंडी - मागाठाणे येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. मातृभाषा मराठीचा जागर संकल्पना राबत हा दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा रंगारंग मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळेल.

घाटकोपर पूर्व, शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांची 11 लाख 11 हजार 316 (शिक्षक दिन निम्मित, शिक्षक सन्मान हंडी)-आयशा खान,द्विंदु शर्मा,अमृता खानविलकर,आफताब शिवदासनी,रॅपर सांबाता,सोनल चव्हाण,हुसेन मन्सुरी,रेहमान खान,पार्थ भालेराव,रितेश देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव 2026 यंदाची दहीहंडी तब्बल 71 लाखांची!, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह कलाकारांची उपस्थिती.. ठाण्यात भाजप आमदार शिवाजी पाटील - गोविंदा पथकांसाठी 71 लाखांची बक्षीस देण्यात येणार आहे... या कार्यक्रमात सुद्धा मनोरंजन कार्यक्रम सेलिब्रिटींची हजेरी पाहायला मिळेल.

घाटकोपर - मनसेचे गणेश चुक्कलांची अनोखी हंडी, जेन-झीच्या क्रांतीला सलामी देणारी हंडी..2025 च्या दहीहंडी उत्सवात ज्या ठिकाणी सर्वात प्रथम जय जवान गोविंदा पथक यांनी 10 थर लावून विश्वविक्रम रचला तीच दहीहंडी म्हणजे श्री गणेश चुक्कल यांची अमृत नगरची दहीहंडी, ज्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं.तसेच शिक्षण क्षेत्रात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराविरुद्ध संतप्त होऊन GEN-Z नी एकत्र येऊन जो लढा उभा केला, आंदोलन उभं केलं, त्यातून आजच्या युगातली तरुणांनी घडवून आणलेली क्रांती संपूर्ण देशाने पाहिली. त्यामुळे महासत्तेला देखील त्यांच्यासमोर झुकावं लागलं.त्यांच्या याच शौर्याला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर विभाग अध्यक्ष श्री गणेश चुक्कल यांनी यावर्षीची हंडी GEN-Z ला अर्पण केली आहे.गतवर्षी प्रमाणे याही वर्षी या दहीहंडीला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत 980 हून अधिक मंडळांनी रजिस्ट्रेशन केले आहे.तसेच भारतीय उत्कृष्ट क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव, सिने अभिनेते रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, हास्यजत्रेमधील प्रियदर्शनी इंदलकर, रोहित माने, प्रतीक्षा कोते, सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे, क्रे टेक्स तसेच (Japanese) परदेशी नागरिक देखील कार्यक्रमाला विशेष हजेरी लावणार आहेत.त्यामुळेच अमृत नगरचे सर्कल याही वर्षी गर्दीने हाऊसफुल होणार आहे.

शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्याकडून ठाण्यात दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दहीहंडी उत्सवाचे आयोजन विश्वविक्रमाचा 'संकल्प' ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 11 थरांसाठी 21 लाखांचे बक्षीस! ‘हास्य जत्रा’च्या कलाकारांचीही उपस्थिती...

मुंबई - परिवर्तन दहीहंडी उत्सव 2026’ मध्ये युवा महाराष्ट्राचा संकल्प.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नशामुक्ती अभियानाची जांबोरी मैदानावर परिवर्तन दहीहंडी फोडण्यात येणार.. वरळी येथील जांभोरी मैदानावर कॅबिनेट मंत्री, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार जी तसेच भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने भव्य ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव 2026’ आयोजित करण्यात आला आहे.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते नशामुक्ती अभियानाची दहीहंडी फोडण्यात येणार असून ‘ड्रग्स फ्री महाराष्ट्र’चा संकल्प करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा दादरच्या आयडियल च्या गल्लीमध्ये सेलिब्रिटी दहीहंडी आणि महिला गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडली जाईल सकाळी आठ वाजल्यापासून इथे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो मराठी सेलिब्रिटी सुद्धा उपस्थित राहतील.

घाटकोपर - आमदार राम कदम दहीहंडी उत्सव - श्रेयस टॉकीज नाका घाटकोपर पश्चिम-या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा येणार आहे.

शिवसेनेचे इंद्रभान तिवारी यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात - अभिनेत्री अमृता खानविलकर...

दहिसर पूर्व- शिवसेना आयोजित यशोधन फांऊडेशन तर्फे दहिकाला महोत्सव..खास आकर्षण- स्वप्निल बांदोडकर- गायक, हास्यजत्रा फेम- प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, नम्रता संभेराव
वैशाली नगर, सुहासिनी पावसकर रोड, दहिसर पूर्व.

ठाण्यातील दहीहंडी उत्सव- (Dahihandi In Thane 2026)

प्रताप सरनाईक दहीहंडी - ठाण्यातील प्रसिद्ध संस्कृती प्रतिष्ठानतर्फे यंदाही ठाण्यातील वर्तकनगर येथील ठाणे मनपा शाळा क्रमांक 44 च्या पटांगणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या उत्सवात जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या पथकाला 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तर 10 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ठाण्यामधील नऊ थर रचणाऱ्या पथकांना 5 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाका दहीहंडी उत्सव - एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा दहीहंडी उत्सव...

मिरा-भाईंदर - प्रताप फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात यंदा प्रथम पारितोषिक तब्बल 31 लाख रुपये – विक्रम प्रताप सिंह. मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या उत्साहाला आणि गोविंदा पथकांच्या क्रीडाप्रतिभेला व्यासपीठ मिळावे, यासाठी शिवसेना मीरा भाईंदर प्रताप फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत, सेंटर प्लाझा हॉल सर्कल, शांती पार्क, मिरा रोड (पूर्व) येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. 2009 पासून सुरू असलेल्या या दहीहंडी उत्सवाला गेल्या अनेक वर्षांपासून मिरा-भाईंदरकरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दहीहंडीच्या माध्यमातून केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक कार्य आणि समाजोपयोगी उपक्रमांनाही मी सातत्याने प्राधान्य दिले आहे.यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम पारितोषिक तब्बल 31 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध थरांसाठी आकर्षक सलामी रक्कम जाहीर करण्यात आली आहे.

राजन विचारे आयोजित दहीहंडी उत्सव- मुंबई- ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह - जांभळी नाका परिसरात दरवर्षीप्रमाणे ही दहीहंडी होईल सेलिब्रिटी त्यासोबत मराठी कलाकार या दहीहंडीला उपस्थिती लावतात.

युवा स्टार प्रतिष्ठान'तर्फे यंदाही रेमंड संकुलात भव्य दहीहंडी या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून गोविंदा पथकांना प्रोत्साहन देणार आहेत.

मनसे नेते अविनाश जाधव - 25 लाखाची दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे आणि मुंबई आणि ठाण्यातील नावाजलेले गोविंदा पथक या ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी येतात.

ठाणे- प्रबोध डावखरे आयोजित अॅक्वा दहिहंडी उत्सव.. आज संध्याकाळी 4 वाजता..खास आकर्षण- अभिनेत्री स्मिता गोंदकर.. नायट्रो फिटनेस, कन्हैया नगर, कोपरी, ठाणे पूर्व...

नवी मुंबईतील दहीहंडी उत्सव – (Navi Mumbai Dahihandi 2026)

नवी मुंबई - ऐरोलीमध्ये आज शिवसेनेची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. या दहीहंडीला एकूण 11,11,111 रुपयांचे गोविंदा पथकांसाठी बक्षीस ठेवले आहेत. आयोजक विजय चौगुले हेनवी मुंबई महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेता असून शिवसेना पक्षाचे उपनेते आहेत.या दहीहंडीमध्ये गौतमी पाटील, श्रुती मराठे , रिंकू राजगुरू या अभिनेत्री उत्सवामध्ये उपस्थिती लावणार आहे.

नवी मुंबई - आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव - प्रमुख आकर्षण प्रार्थना बेहेरे अभिनेत्री - सायं. 6 वाजल्यापासून

नवी मुंबई दहीहंडी - अंकुश बाबा कदम युवा फाउंडेशन दहीहंडी घणसोली.या दहीहंडीमध्ये गौतमी पाटील उपस्थिती लावणार आहे.

कल्याण डोंबिवली दहीहंडी उत्सव – (Kalyan Dombivali Dahihandi 2026)

कल्याण डोंबिवली दहीहंडी - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची डोंबिवली पूर्व इंदिराचौकात दहीहंडी...

डोंबिवली दहीहंडी - दीपेश म्हात्रे यांची सम्राट चौक डोंबिवली पश्चिम येथे दहीहंडी..

भिवंडीतील दहीहंडी उत्सव- (Bhiwandi Dahihandi 2026)

भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात संस्कार प्रतिष्ठान व स्वर्गीय किरण देशमुख मित्र मंडळाच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव साजरा होत आहे या दहीहंडीला 19 वे वर्ष सुरू असून या दहीहंडी उत्सवात सिने कलाकार सह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती राहणार आहे.

भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड परिसरात युवाशक्ती मित्र मंडळाकडून भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असतो यंदा या मंडळाच्या 16 वे वर्ष असून या परिसरात मोठ्या संख्या यूपी बिहार परिसरातील हिंदी भाषिक नागरिक राहत असल्याने भोजपुरी कलाकारांची या मंडळात उपस्थिती लागत असते. तसेच आज रात्री कृष्णजन्म उत्सव देखील साजरा करण्यात येतो. भक्ती गीत देखील गायले जातात . मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होतात.

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भिवंडी शहरातील आनंद दिघे चौकात धर्मवीर प्रतिष्ठान च्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असतो.  शिंदे गटाचे सुभाष माने यांचे नेतृत्वाखाली हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत असतो मात्र या दहीहंडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लागत असते तसेच कलाकार देखील या मंडळाला भेट देत असतात.

पुणे आणि पिंपरी चिंचवड सेलिब्रिटी दहीहंडी-(Dahihandi In Pune)

पुणे - पुनीत बालन दहीहंडी पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल चौकात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक दहीहंडी संध्याकाळी 5.30 वाजता होणार आहे.. पुनीत बालन यांच्या पुढाकाराने 31 दहीहंडी मंडळ एकत्र येऊन ही दहीहंडी संयुक्तरीत्या आणि DJ मुक्त साजरी केली जाते.. DJ मुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे. हीच परंपरा त्यांनी दहीहंडीत देखील कायम ठेवली आहे.. इतकच नाही तर यंदाच्या दहीहंडीत वारकरी संप्रदायाची ओळख असणारे टाळ मृदुंग यांचा देखील समावेश असणार आहे.. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख 11 हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे त्याशिवाय सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पुनीत बालन ग्रुप कडून पंधरा हजार रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे.- शिवानी असणार आहे. पण तरी स्टँडबाय लिंक रिपोर्टरकडून लवकर घेणे.

पुणे - भव्य दहीहंडी उत्सव.. श्री बालाजी ग्रुप.. बालवीर मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ - खास आकर्षण - राधा पाटील - स्थळ - बालाजी मंदिर, जुना मोटर स्टॅन्ड, भवानी पेठ, पुणे - वेळ - शनिवार दि. ५ सप्टेंबर रोजी सायं. ६.०० से १०,००

क्रिकेट प्लेअर सूर्यकुमार यादव - भोसरी येथील भैरवनाथ दहीहंडी उत्सव; नगरसेवक योगेश लांडगे आयोजक

अभिनेत्री राशी खन्ना (फेम – ‘योध्दा’), महिमा मकवाना (फेम – ‘मुसाफिर कॅफे’), नेहा सोनवणे (फेम – ‘रौंदळ’) आणि रुचिता जामदार (फेम – ‘बिग बॉस मराठी सीझन ६’) यांची विशेष उपस्थिती - पिंपरी गाव येथील नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित दहीहंडी उत्सव

अभिनेत्री निधी अग्रवाल, अभिनेत्री गिरजा प्रभू, हास्य जत्रा फिल्म प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव.. वाकड येथे राम वाकडकर आयोजित दहीहंडी उत्सव

अभिनेत्री शिवानी सोनार, अभिनेत्री विजया बाबर, अभिनेत्री महिमा म्हात्रे अभिनेता राज हंचनाळे दापोडी येथे माजी नगरसेवक रोहित काटे आयोजित दहीहंडी उत्सव

पुणे - प्रभाग क्रमांक ४१ मधील भव्य दहीहंडी उत्सव शिवछत्रपती तरुण मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये यंदा लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. शनिवार,५ सप्टेंबर २०२६ | सायं. ६:३० वा. तरवडे वस्ती, पोलीस स्टेशनसमोर, डी.पी. रोड

महाराष्ट्रातील इतर दहीहंडी उत्सव – (Dahihandi In Kolhapur Khed Chhatrapati Sambhajinagar)

कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये आज दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो... खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले...संध्याकाळी पाच वाजता या दहीहंडीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.

खेड तालुक्यात यंदा दहीहंडीचा जल्लोष अगदी खास आणि दणक्यात असणार आहे! 'मी सेवेकरी सोशल फॉऊंडेशन'तर्फे. बिग बॉस' विजेती अभिनेत्री तन्वी कोलते आज सायंकाळी 6 वाजता.. कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, खेड.

छत्रपती संभाजीनगर -नमो दहीहंडी महोत्सव-2026  यावर्षी आपल्या भेटीला अभिनेत्री मीरा जगन्नाथ येत आहेत आज सायंकाळी 5 वाजता.. पुंडलिक नगर, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर.

अमरावती -  जन्माष्टमीच्या निमित्याने अमरावती येथील राजकमल चौक येथे नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे दहीहंडी उत्सव - 2026 चे आयोजन आज 5 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. कोरोनामुळे बंद पडलेलं आयोजन सहा वर्षांनी पुन्हा होत असल्याने आयोजक आणी अमरावतीकर नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. आज राजकमल चौक येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता संघटनेतर्फे आवश्यक तयारी देखील सुरु आहे. प्रथम, द्वितीय आणी तृतीय विजेत्या गोविंदा पथकांसाठी अनुक्रमे  51,000/-, 31,000/- आणी 21,000/- रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहेत.

सोलापूर - गोकुळाष्टमी निमित्ताने आज सोलापुरात शहरात दहीहंडी साजरी करण्यात येते. सोलापूर शहरातील बाळीवेस परिसरात विविध संघटनाच्यावतीने सामाजिक विषयाशी निगडित असलेले दहीहंडी उत्सवात पाहायला मिळतात.

गोंदिया जिल्ह्यात दिड दिवसाच्या श्री कृष्णाला आज निरोप देण्यात येणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी घराघरात मोठ्या उत्साहात श्रीकृष्ण च्या मूर्तीची स्थापना करण्यात आली असुन आज श्रीकृष्ण मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. ग्रामीण भागामध्ये एकत्रित पारंपरिक वाद्यांच्या तालात मिरवणूक काढण्यात येते.

धाराशिव- कृष्णा जन्माष्टमी निमित्त धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी कृष्णा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

धुळे- दहीहंडीचा उत्सव शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिलांची दहीहंडी दरवर्षी आयोजित केली जाते यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अवैध धंद्यांची दहीहंडी उद्या फोडली जाणार आहे.

सातारा- छत्रपती राजधानी दहीहंडी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने उद्या गांधी मैदान  येथे  होणार आहे.. यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित असणार आहे..5,55,555 रुपयांची बक्षिसे असणार आहेत.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहीहंडीचे सर्व अपडेट्स, VIDEO:

Read Entire Article