Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं

1 month ago 8
ARTICLE AD
<p><strong>Dahihandi In Mumbai Thane Pune Live 2026: </strong>आज 5 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभरात दहीहंडी (Dahihandi 2026 ) उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत आहे. या महोत्सवात तब्बल 71 लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. गोविंदा पथकांचा मोठा सहभाग आणि &lsquo;सेलिब्रिटी हंडी&rsquo; म्हणून मिळालेली ओळख यामुळे या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.</p>
Read Entire Article