Dattatray Bharne: राज्यात दुष्काळाची (Maharashtra Drought) परिस्थिती गंभीर बनली असून राज्य सरकारने आतापर्यंत 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या (Maharashtra Farmers) नुकसानीचे पंचनामे (Drought Panchanama) करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, 25 सप्टेंबरच्या शासन निर्णयात 75 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आले आहे, मात्र दुष्काळाच्या निकषात न बसणाऱ्या आणखी 19 तालुक्यांचा फेरविचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या 19 तालुक्यांचा दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दत्तात्रय भरणे म्हणाले, “आपल्या राज्यात 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की, पंचनामे करण्यात यावेत. शेतकरी नुकसान किती झालं आहे याचा आढावा घ्यावा. राज्यात 1 कोटी 49 लाख हेक्टर 65 लाख 26 हेक्टर जमिनीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बाकी काम देखील सुरू आहे. 10 तारखेपर्यंत सर्व पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महसूल कृषी अधिकारी बांधावर जाऊन पंचनामे करत आहे. विभागनिहाय पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर विभागात 68 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पुणे विभागात 30 टक्के, तर नाशिक विभागात 22 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोकण विभागात पंचनाम्यांचे प्रमाण सर्वात कमी असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Dattatray Bharne: 17 हजार कोटी रुपयांची मागणी

दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले की, “दुष्काळ पाहणीसाठी केंद्र सरकारने पथक तयार केले आहे. मुक्तानंद अगरवाल प्रमुख असणार आहेत. पुढील 4 ते 5 दिवसांत महाराष्ट्रात येणार आहेत. जलसंधारण कृषी विभागाच्या माध्यमातून आपण काम करत आहोत. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सोबत आहे. 17 हजार कोटी रुपयांची मागणी आपण केली आहे. केंद्र सरकारने नक्कीच आपल्याला मदत केली आहे.”, असे त्यांनी म्हटले.

Dattatray Bharne: 33 लाख महिलांनी अर्ज केलेत

“43 टक्के पंचनामे झाले आहेत. 265 तालुक्यांव्यतिरिक्त इतर देखील तालुके आम्ही सहभागी करत आहोत. जसे 19 तालुके आम्ही वाढवत आहोत तसेच इतर तालुक्यांबाबत आपण परिस्थिती पाहून निर्णय घेणार आहोत. राज्यात पीक राहिलेले नाही. त्यामुळे मदत मिळणं गरजेचे आहेच. महिला शेतकरी धोरण हे विधेयक आपल्या राज्याने आणलं आहे. 17 सप्टेंबरपासून सुरुवात केली आहे. 33 लाख महिलांनी अर्ज केले आहे. सर्वात जास्त 2 लाख यवतमाळ जिल्ह्यातून अर्ज आले आहेत.”, अशी माहिती देखील दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Dattatray Bharne: 19 तालुके कोणते?

25 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार ज्या तालुक्यांमध्ये 75 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आले आहे, मात्र ते दुष्काळाच्या निकषात बसत नाहीत, अशा 19 तालुक्यांचा फेरविचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या 19 तालुक्यांचा दुष्काळ जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवण्यास सांगण्यात आले आहे.

विभाग

जिल्हा

तालुके

संख्या

छत्रपती संभाजीनगर

नांदेड

सुरतखेडा, मुखेड, अर्धापूर

3

नागपूर

चंद्रपूर

चिमूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर

3

नागपूर

गोंदिया

आमगाव, देवरी, सालेकसा, गोंदिया

4

नागपूर

वर्धा

कारंजा

1

नागपूर

भंडारा

मोहाडी, तुमसर

2

नाशिक

नाशिक

त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड

3

पुणे

सातारा

पाटण

1

पुणे

सांगली

शिराळा, कडेगाव

2

एकूण

19 तालुके

19

आणखी वाचा

Radhakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?