Delhi Jantar Mantar Protest: निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलनाची तयारी; कार्यकर्त्यांना पोलिसांचे फोन अन् धमक्या? कार्यकर्त्यांची धरपकड

3 weeks ago 4
ARTICLE AD

मुंबई :  दिल्ली आंदोलनाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर असणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर (Delhi Jantar Mantar Protest) आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांचे वारंवार फोन येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. फोन, लोकेशनची विचारणा आणि कारवाईच्या भीतीमुळे विद्यार्थी व कार्यकर्त्यांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबई, ठाणे आणि मुंब्रा पोलिसांकडून कार्यकर्त्यांना फोन करून दिल्लीला जाणार का, कुठे आहात, कोणत्या ट्रेनने प्रवास करत आहात, अशी विचारणा केल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.(Delhi Jantar Mantar Protest)

आंदोलनात सहभागी झाल्यास भविष्यात अडचणी निर्माण होतील, असा इशारा देणारे संदेश मुंबईतील हाउसिंग सोसायट्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल होत आहेत. आंदोलनासाठी दिल्लीला जाणाऱ्यांची माहिती मुंबई, दिल्ली पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे (RPF) असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे; मात्र संबंधित पोलिसांकडून आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 10 ऑक्टोबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील कार्यकर्त्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोशल मिडियावर काही आंदोलनासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना जा वेळी पोलिसांनी अडवले त्यावेळी अनेक विद्यार्थी यांनी त्याचे रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत.(Delhi Jantar Mantar Protest)

View this post on Instagram

A post shared by SAHI SAWAAL (@sahisawal.official)

Delhi Jantar Mantar Protest: दिल्लीला चाललेल्या पुण्यातील कार्यकर्त्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले

SIR विरोधातील दिल्ली येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या NSYF (न्यू स्टुडंट्स ॲण्ड युथ फेडरेशन) , RRR महाराष्ट्र (संघर्ष, लोकशाही, परिवर्तन अभियान) आणि AISF (ऑल इंडीया स्टुडंट्स फेडरेशन) च्या एकुण 18 कार्यकर्त्यांना मध्य प्रदेश पोलिसांनी इटारसी रेल्वे स्थानकावर जबरदस्तीने ट्रेनमधून खाली उतरवले. त्यांना कोणत्याही पोलीस ठाण्यात न नेता, डिटेन्शन सेंटर म्हणून तयार करण्यात आलेल्या एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे. यापूर्वी महाराष्ट्र पोलिसांनीही जळगाव रेल्वे स्थानकावर अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.  RRR, नव समाजवादी पर्याय, NSYF, pucl, भारतीय कामगारांचा क्रांतिकारी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आदी संघटनांनी या कृत्याचा निषेध केला आहे.

दिल्लीमध्ये 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निदर्शनांपूर्वी CJP आणि डाव्या संघटनांनी देशभरातील समर्थकांना ताब्यात घेतल्याचा आरोप केला आहे. कॉकरोच जनता पार्टीने सांगितले की, पुण्यातील विद्यार्थ्यांना दिल्लीला जात असताना मध्येच ताब्यात घेण्यात आले. त्यांना बसमधून अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. दरम्यान, CJPने मध्य प्रदेशातील एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात चालत्या बसमधील तरुण दिसत आहेत. एका तरुणाने मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना धमकावल्याचाही त्यांनी आरोप केला. वास्तविक, 10 ऑक्टोबर रोजी CJP दिल्लीतील जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने करणार आहे. दरम्यान, दिल्ली पोलिस दिल्लीतील हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसची तपासणी करत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

Delhi Jantar Mantar Protest: 10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर CJPचे आंदोलन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉकरोच पार्टी 10 ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलन करणार आहे. दीपके यांनी 2 ऑक्टोबरच्या रात्री ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले होते की, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभरातून कॉकरोच दिल्लीला पोहोचतील. त्यांनी असेही म्हटले होते की, दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर-मंतरपर्यंत पोहोचण्यापासून रोखले, तर त्यांना जिथे रोखले जाईल, तिथेच जंतर-मंतर उभारले जाईल.

Read Entire Article